शिवराज फार्मसीतर्फे वृक्षारोपण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवराज फार्मसीतर्फे वृक्षारोपण
शिवराज फार्मसीतर्फे वृक्षारोपण

शिवराज फार्मसीतर्फे वृक्षारोपण

sakal_logo
By

37795
शिवराज फार्मसीतर्फे वृक्षारोपण
गडहिंग्लज: शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीच्या एनएसएस विभागाच्या वतीने लिंगनूर, कसबा नूल येथे आंबा, चिंच, जांभूळ यासह विविध प्रकारची ५० रोपे लावण्यात आली. प्राचार्य डॉ. संतोष कुरबेट्टी यांनी स्वागत केले. सरपंच परमेश्‍वरी पाटील, ग्रामसेविका रेश्मा मेटील आदी उपस्थित होते. एनएसएसचे विभागप्रमुख प्रा. प्रणव सावेकर यांनी आभार मानले.
--------------------------------------------

पाटील पतसंस्थेला थोरात यांची भेट
गडहिंग्लज : येथील पी. सी. पाटील गुरुजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेला प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य नेते संभाजीराव थोरात यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी संस्थेचे व्याजदर, डिजिटल पासबुक सुविधा, ३१ लाखांपर्यंत कर्ज, लखपती ठेव योजना, ‘आरटीजीएस’ची सुविधा, विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्‍या विविध उपक्रमांबद्दल गौरवोद्‍गार काढले. मधुकर येसणे यांनी स्वागत केले. सभापती बाळासाहेब वालीकर यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. शिक्षक बँकेचे नूतन अध्यक्ष अर्जुन पाटील, उपाध्यक्ष पद्मजा मेढे, संचालक नंदकुमार वाईंगडे आदी उपस्थित होते. उपसभापती अनिल बागडी यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79811 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..