पोलिस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त
पोलिस वृत्त

पोलिस वृत्त

sakal_logo
By

३७८०६

उजळाईवाडी मंदिरातील
चोरीचा दिवसांत छडा
परिसरातीलच संशयिताकडून मुद्देमाल जप्त
उजळाईवाडी, ता. २२ ः उजळाईवाडी (ता. करवीर) येथील मंदिरातील चोरीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एका दिवसात छडा लावला. याप्रकरणी तरुणास जेरबंद केले. राजा ऊर्फ रविराज महेश कसबेकर (वय २१, टेंबलाई नाका परिसर) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून २० हजारांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय गोर्ले यांनी दिली.
पोलिसांनी सांगितले, उजळाईवाडी येथील साई मंदिरात १९ जुलैला चोरी झाली होती. चोरट्याने बंद दरवाज्याचा कडीकोयंडा उचकटून मूर्तीसह अलंकार, भांडी असा ऐवज चोरून नेला होता. याची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली. हा प्रकार संशयित राजा ऊर्फ रविराजने केला असून तो चोरलेल्या वस्तू विक्रीसाठी कंदलगाव येथील एका हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून २० हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे गोर्ले यांनी सांगितले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक संजय गोर्ले, सहायक निरीक्षक शिवानंद कुंभार तसेच अंमलदार सुरेश पाटील, असिफ कलायगार, रामचंद्र कोळी, विनोद कांबळे, रणजित पाटील, अनिल जाधव, संजय पडवळ व संतोष पाटील यांनी केली आहे.

सीसीटीव्हीची मदत
उजळाईवाडी ग्रामपंचायतीने नव्यानेच बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे चोरटे पकडण्यासाठी पोलिसांना मोलाची मदत झाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79816 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top