जयसिंगपूरमध्ये रॅट ग्लू बोर्डवर चिकटलेल्या पक्षाची सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयसिंगपूरमध्ये रॅट ग्लू बोर्डवर चिकटलेल्या पक्षाची सुटका
जयसिंगपूरमध्ये रॅट ग्लू बोर्डवर चिकटलेल्या पक्षाची सुटका

जयसिंगपूरमध्ये रॅट ग्लू बोर्डवर चिकटलेल्या पक्षाची सुटका

sakal_logo
By

जयसिंगपूरमध्ये रॅट ग्लू बोर्डवर
चिकटलेल्या पक्षाची सुटका
दानोळी, ता. २२ : जयसिंगपूर येथे उंदीर पकडायच्या रॅट ग्लू बोर्डवर चिकटलेल्या पक्षाची सुटका येथील प्राणीमित्र अक्षय मगदूम यांनी केली.
बोर्डवर चिटकलेले उंदीर दूर सोडताना बोर्डसहित सोडले अथवा टाकले जाते. त्यामुळे निसर्गात ती तशीच पडून राहतात. बोर्डचा चिकटपणा कॉन्सट्रेटेड अधेसिवपासून बनवला असल्याने तो लवकर वाळत नाही. परिणामी निसर्गात वावरणारे निसर्गोपयोगी जीवजंतू याला अडकून बसतात व तडफडून मृत्यू पावतात. कधी कधी या बोर्डवर अडकलेले उंदीर खाण्यासाठी साप, मांसाहारी पक्षी येतात व तेही या बोर्डवर चिटकून बसतात व कालांतराने तडफडून मृत्यू पावतात.
उंदीर पकडण्यासाठी रॅट ग्लू बोर्डपेक्षा पिंजरा वापरणे अधिक सोपे व कमी खर्चाचे आहे. शिवाय अडकलेले उंदीर सोडणेही सोपे जाते. रॅट ग्लू बोर्ड वापरून झाल्यावर त्याची योग्य व पूर्ण विल्हेवाट लावावी, त्याचा चिकटपणा पूर्णपणे गेल्याशिवाय त्याला निसर्गात कुठेही टाकू नका, असे आवाहन अक्षय मगदूम यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79826 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..