
गडहिंग्लजमधील जीवघेणे खड्डे मुजवा
37813
----------------
गडहिंग्लजमधील जीवघेणे खड्डे बुजवा
‘भाजयुमो’ची मागणी : मुख्याधिकाऱ्यांचे वेधले लक्ष
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २२ : पंधरा दिवस झालेल्या पावसाने शहरात ठिकठिकाणी पडलेले जीवघेणे खड्डे पालिका प्रशासनाने त्वरित बुजवावेत अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज केली. मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांना याबाबतचे निवेदनही दिले.
गडहिंग्लज शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. जूनमध्ये मुरुमाद्वारे दुरुस्ती केली होती. परंतु पहिल्याच पावसात मुरुमाचा पत्ताच लागला नाही. खड्ड्यांची व्याप्तीही मोठी झाली. मोठ्या आकाराचे खड्डे पडल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. संकेश्वर रोड, वीरशैव बँक, बस स्थानक परिसर, एम. आर. हायस्कूलजवळ अशा महत्त्वाच्या आणि रहदारीच्या ठिकाणीच खड्डे पडले आहेत. याशिवाय बांधकाम विभागाकडे असणाऱ्या भडगाव रोडवर मराठा चित्रमंदिर, कडगाव रोडवरील एमएसईबी कार्यालयाजवळ मोठमोठे खड्डे पडलेत. याचा त्रास नागरिकांना होत आहे. वाहनधारकांना छोट्या मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे. चार चाकी वाहनांचेही नुकसान होत आहे. प्रवाशांच्या कंबरेला इजा पोहचत आहे. तातडीने हे जीवघेणे खड्डे संबंधित विभागांनी बुजावावेत व नागरिकांना खड्ड्यांपासून मुक्तता द्यावी अशी मागणी आहे. तत्काळ कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संग्राम आसबे, भाजपचे शहराध्यक्ष राजेंद्र तारळे, वरुण गोसावी, प्रितम कापसे, अमर पोटे, अभिनंदन पाटील, विश्वजित पोवार, विशाल कानडे, सुनील गुरव, शैलेंद्र कावणेकर, सुदर्शन चव्हाण, आशुतोष उपराटे, सचिन डोमणे, अशोक शिंदे, संग्राम कुराडे आदींच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.
---------------------------------------
श्री. अजित माद्याळे...
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79832 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..