भाकप निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाकप निदर्शने
भाकप निदर्शने

भाकप निदर्शने

sakal_logo
By

37751

भाकपतर्फे बिंदू चौकात निदर्शने
कोल्हापूर, ता. २२ ः संसद भवनावरील राष्‍ट्रीय चिन्हात बदल केल्याबद्दल भाकपतर्फे आज बिंदू चौकात निर्दशने करण्यात आली.
कार्यकर्त्‍यांनी राष्‍ट्रीय चिन्ह्यात बदल करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा दिल्या.
जिल्हाध्यक्ष सतीश्चंद्र कांबळे म्हणाले, ‘केंद्र सरकार हुकूमशाही पद्धतीने कारभार चालवू इच्छित आहे. संविधान बदलण्याची त्यांची धडपड दिसते. देशाला संविधानासोबत राष्‍ट्रीय चिन्ह मिळाले होते. त्यात मोदी सरकारने बदल केला आहे. या सरकाराला लोकशाही नको आहे, असेच दिसते.’
ज्येष्ठ नेते दिलीप पोवार म्हणाले की, देशाच्या राष्ट्रीय चिन्हाला इतिहास आहे. ते शक्ती, धैर्य, आत्मविश्वास व अभिमानचे प्रतीक आहे. असा व्यापक अर्थ असलेल्या राष्‍ट्रीय चिन्हात बदल करणे हे राष्ट्रदोहासारखेच कृत्य आहे. राष्ट्रीय कौन्सिल सदस्य नामदेव पाटील म्हणाले की, एखाद्या कलाकृतीत बदल करायचा आणि कालांतराने हीच मूळ कलाकृती होती, असे भासवून जनतेची दिशाभूल करायची, असा या सरकारचा डाव आहे. जनता असा डाव खपवून घेणार नाही.
शहराध्यक्ष रघुनाथ कांबळे, एस. बी. पाटील, दिनकर सूर्यवंशी, प्रशांत आंबी, धीरज कटारे, मिलिंद यादव, हरिश कांबळे, चंद्रकांत कांबळे, अमिन पाटणकर, अशोक पुणेकर, मानसिंग खाडे यांनी निदर्शनात सहभाग घेतला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79943 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top