
इचलकरंजी महापालिका महासभेत १८ विषय मंजूर
इचलकरंजी महापालिका
महासभेत १८ विषय मंजूर
इचलकरंजी, ता. २२ ः इचलकरंजी पालिकेचे महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर प्रशासकीय पातळीवरील पहिली महासभा नुकतीच झाली. यामध्ये विविध १८ विषयांना मंजुरी देत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामध्ये जीएसटी परतावा अनुदान मागणी करण्यासह विविध विषयांचा समावेश आहे. याशिवाय राजर्षी शाहू हायस्कूलकडील पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवण्याच्या १४ लाख ४२ हजारांच्या अंदाजपत्रकास मंजुरी दिली.
इचलकरंजी पालिकेचे महापालिका म्हणून शासनाने रूपांतर केले आहे. त्यानंतर प्रशासक म्हणून सुधाकर देशमुख यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी महापालिकेचे प्रशासकीय कामकाज सुरू आहे. यामध्ये प्रत्येक महिन्याच्या २० तारखेपूर्वी महासभा घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार याबाबतची प्रशासकीय महासभा झाली. प्रशासकांनी घेतलेल्या विविध निर्णयांसह महत्त्वाच्या विषयांना या महासभेत मंजुरी दिली. याबाबतची माहिती आज महापालिकेकडून खुली केली.
--
महासभेसमोर मंजूर केलेले विषय असे...
* महापालिका क्षेत्रातील कामकाजाचे नियमन करण्याबाबत आदेश निर्गमित करणे
* महाराष्ट्र सुरक्षा मंडळ (मुंबई) यांच्याकडून अधिकारी व सुरक्षा रक्षक घेणे
* तीन प्रकारच्या सेवांकरिता संवर्गातील ४२ पदांच्या आकृतिबंधास मंजुरी मिळण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करणे
* महानगरपालिकेचे बोधचिन्ह व सामान्यमुद्रा तयार करणे
* कर, लेखा व आस्थापना विभागास नवीन संगणक प्रणाली उपलब्ध करणे
* आयुक्तांसाठी खासगी निवासस्थान भाड्याने घेणे
* जागा आरक्षण फेरबदल डीपी युनिटकडे पाठवणे
* झेंडा चौक ते पोटफाडी रस्ता भूसंपादन करणे
* नियोजित सभागृहात विविध सोयीसुविधा देण्यासाठी ६ कोटी ३९ लाखांचे अंदाजपत्रक मंजुरी करणे व तांत्रिक मंजुरीनंतर निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवणे
* टागोर वाचनालयाकडील फी वाढीसंदर्भातील ठरावात दुरुस्ती करणे
* पाचवीच्या विद्यार्थ्यांना टॅब पुरवण्याची ई - निविदा रद्द करणे
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79970 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..