
राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेत सृष्टी भोसले ची दमदार कामगिरी
37902
राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेत
सृष्टी भोसलेची कामगिरी
कोल्हापूर, ता. २२ : भुवनेश्वर, ओडिसा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेत कोल्हापुरची कन्या सृष्टी भोसले हिने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना उत्कृष्ठ कामगिरी करत रौप्यपदक पटकावले.
स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया मार्फत १६ ते २० जुलै दरम्यान ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या मुलींच्या संघाने चांगली कामगिरी करत दिल्ली, आसाम, कर्नाटक व पश्चिम बंगालच्या संघाना पराभूत करत सलग चार सामने जिकून अंतिम फेरीत धडक मारली. केरळविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. संघ निवडीसाठी राष्ट्रीय निवड प्रशिक्षक म्हणून निळकंठ आखाडे, योगेश निर्मळ व संजीवनी वानखेडे वॉटर पोलोचे प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. तिला प्रशिक्षक डांगे, अजय पाठक यांचे मार्गदर्शन लाभले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79971 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..