महावितरण अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरण अपघात
महावितरण अपघात

महावितरण अपघात

sakal_logo
By

वीज कर्मचारी फोटो

आणखी किती बळींची वाट बघणार
तीन वर्षांत १० कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचे मृत्यू; भरपाईबाबत महावितरणचे दुर्लक्ष

शिवाजी यादव : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ : महावितरणद्वारे विजेचे काम करताना अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. पडवळवाडी येथे काल वीज दुरुस्ती करताना प्रथमेश सुतार २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. तीन वर्षांत १० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मृत्यू झाले. त्यांना शाश्वत भरपाई मिळालेली नाही. असे असतानाही जे कर्मचारी महावितरणच्या पटावर कायमस्वरूपी नाहीत, जे कंत्राटी कामगार आहेत, अशा कंत्राटी व शिकाऊ, उमेदवारांना धोकादायक काम देण्यात येते. हेच काम जीवघेणे ठरले आहे. अशा दुर्घटनाकडे महावितरणकडून कानाडोळा केला जात असल्याने कामगारांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.
महावितरण वीज देखभाल दुरुस्ती तसेच नवीन जोडणी देण्याचे काम चालते. परिमंडळाचे मुख्य अभियंता, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता, शाखा अभियंता काम करतात. शाखा व कनिष्ठ अभियंता मार्गदर्शनाखाली लाईनमन काम करतात. या लाईनमनला सहाय्य करणारे कंत्राटी कर्मचारी यासोबत आयटीआय प्रशिक्षण झाल्यानंतर शिकाऊ म्हणून काम करणारे वायरमनही विद्यार्थी महावितरणच्या सेवेत असतो त्यांच्या पैकीच प्रथमेश हाही आहे.
दुरुस्तीचे काम करताना अनेकदा पोलवर चढावे लागते. डीपी, ट्रान्सफ्रामर, विद्युत तारा, फ्युज बॉक्स अशा तांत्रिक साधनाची हाताळणी करावी लागते. यात विजेचा दाब (लहरी) अदृश, रंग व गंध हीन आहेत. अशा तारेला चुकून स्पर्श झाला तरी जीवाचा धोका निर्माण होतो.
विद्युत तारा ४४० व्होल्ट ते ११ केव्ही क्षमतेच्यावर आहेत. त्यावर काम करताना क्षणाक्षणाला जीवाची बाजी लावावी लागते. असे काम अभियंत्याच्या मार्गदर्शनाखाली योग्य त्या खबरदारी घेऊन करावी लागते. लाईनमन खांबावर चढून काम करावे लागते. मात्र अनेकदा कंत्राटी कामगार किंवा शिकाऊ कामगारांना अशा धोकादायक कामात सहभागी करून घेतले जाते.
--
अंमलबजावणीत जैसे थे
सुरक्षिततेची साधने न घेता, अनुभव नसताना भौगोलीक स्थितीचा अंदाज न घेता अनेकदा कर्मचारी काम करतात. एखाद्या वेळीच काही तरी चूक घडते अपघात होतात, काहीजण जखमी होतात तर काहींचा मृत्यू होतो. अपघात घडल्यानंतर अधीक्षक अभियंता कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा घेतात. खबरदारी घेण्याच्या सूचना देतात व नियमावली सांगतात. रेकॉर्ड झाले की, विषय संपवला जातो. पुढे अंमलबजावणी करताना पुन्हा जैसे थे दिसते.

‘‘कंत्राटी कर्मचाऱ्यांनी खांबावर चढून काम करणे नियमात नाही तरीही कंत्राटींना खांबावर चढवले जाते. देखभाल दुरुस्ती करण्याबरोबर बिलांची वसुली करावी लागते. याशिवाय ग्रामीण भागात एका कंत्राटीकडे तीन ते गावातील वीज दुरुस्तीचे काम दिले जाते. तेथे एक दोघे कंत्राटी दुरुस्ती काम करतात हे धोकादायक ठरू शकते. कंत्राटीनी धोकादायक काम करण्यास नकार दिल्यास नोकरी घालवण्याची भिती दाखवली जाते. यातून दबावात काम करताना दुर्घटना घडल्या आहेत’
-अमर लोहार, जिल्हाध्यक्ष, महाराष्‍ट्र वीज कंत्राटी संघ.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80144 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..