
संक्षिप्त
ऐश्वर्याला आर्थिक मदतीसाठी
आमदार पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
कोल्हापूर : विम्बल्डन टेनिस मैदानात कडवी झुंज देत भारतीयांचे लक्ष वेधणाऱ्या ऐश्वर्या जाधव हिला मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली आहे. अशा मागणीचे पत्र आमदार ऋतुराज पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले. पत्रात म्हटले आहे, कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील यवलूज येथील १३ वर्षीय टेनिसपटू ऐश्वर्या जाधवला खेळाचा दर्जा वाढविण्यासाठी व विविध स्पर्धांत सहभागी होण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. जागतिक पातळीवरील टेनिसपटू ज्या विम्बल्डन कोर्टवर चमकले त्याच कोर्टवर कोल्हापूर कन्या ऐश्वर्या हिने खेळाने सर्वांची मने जिंकली. ऐश्वर्याची कौटुंबिक परिस्थिती प्रतिकूल असून या स्पर्धांचा खर्च तिला न पेलवणारा आहे. तिच्या कार्याचा व परिस्थितीचा विचार करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तिला जास्तीत जास्त आर्थिक सहाय्य मंजूर करावे, अशी विनंती आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
04189
इचलकरंजी : सर्जेराव जरग निधनानंतर जरग कुटुंबीयांना जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी आर्थिक मदत करत मोठा आधार दिला.
जरग कुटुंबीयांना महसूल कर्मचाऱ्यांचा आधार
इचलकरंजी : महसूल कर्मचारी पतसंस्थेचे व्यवस्थापक सर्जेराव जरग निधनानंतर जरग कुटुंबीयांना जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी आधार दिला आहे. १ लाख ७० हजार ९१३ रुपये जरग कुटुंबाकडे सुपूर्द केले. जरग कुटुंबाला सावरण्यासाठी आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने महसूल कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातून निधी गोळा करण्याचे ठरविले. त्याला जिल्ह्यातील नायब तहसिलदार, महसूल कर्मचारी, महसूल कर्मचारी खाते पतसंस्थेचे आजी, माजी सभासद तसेच कोषागार कार्यालयातील कर्मचारी यांनी उत्स्फूर्त साथ दिली. ही आर्थिक मदत आज जरग कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांच्या आई, पत्नी व मुलाकडे दिली. यावेळी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे सुनील देसाई, जिल्हा कोषागार कार्यालय प्रतिनिधी श्री.कामत यांसह महसूल कर्मचारी उपस्थित होते.
38056
पाटील शाळेची पदभ्रंमती मोहिम
कोल्हापूर ः कसबा बावडा येथील यशवंतराव भाऊराव पाटील शाळेची पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिम नुकतीच झाली. शिक्षक दत्तात्रय चौगुले, मुख्याध्यापिका गौतमी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेली सात वर्षे या मोहिमेचे आयोजन केले जाते. आठवी व नववीचे साठहून अधिक विद्यार्थी व विद्यार्थीनी मोहिमेत सहभागी झाले. पर्यावरणाचे रक्षण व वृक्ष संवर्धनासाठी शाळेतील पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी फळे व फुलांच्या सुमारे पाच हजार दोनशे बिया संकलित केल्या होत्या. त्या पदभ्रंमती मार्गावर पेरण्याचा उपक्रमही झाला. यावेळी ‘हिल रायडर्स'' चे अध्यक्ष प्रमोद पाटील, प्राचार्य डॉ. महादेव नरके उपस्थित होते.
03029
कोदवडे : वृक्षारोपण करून वनसंवर्धन दिन साजरा करताना विद्यार्थी.
कोदवडे येथे वृक्षारोपण
राशिवडे बुद्रुक : जागतिक वनसंवर्धन दिनानिमित्त आज येळवडे ( ता. राधानगरी) येथील श्रीमान छत्रपती सांस्कृतिक शैक्षणिक कला अकादमीतर्फे वृक्षारोपण करण्यात आले. संस्थेच्या वतीने कोदवडे येथील जंगल परिसराच्या पायथ्याला असलेल्या टेकडीवर रेडीएंट अकॅडमीच्या नवीन वास्तूच्या परिसरात विविध जातीची रोपे लावली. संस्थापक अध्यक्ष आर.जी.पाटील, गणपती पाटील, सचिव राजेंद्र पाटील, विरेंद्र पाटील, आर.आर.पाटील, शैलेश पाटील, अजित सरवळकर, संतोष डोंगळे, संतोष देसाई, अमोल राबाडे, संजना डोंगळे, माधवी जोंग, संजीवनी पाटील, योगेश पवार, सुरज पाटील, अशोक पाटील, सरदार पाटील, संभाजी राबाडे यांच्या हस्ते विविध जातीची रोपे लावण्यात आली. आशिष सावेकर यांनी प्रास्ताविक केले.
01133
सोनाळी उपसरपंचपदी जोतीराम गुरव
सोनाळी ः सोनाळी ( ता. करवीर ) येथील उपसरपंचपदी जोतीराम साताप्पा गुरव यांची निवड झाली. अध्यक्षस्थानी सरपंच मोहन पाटील होते. उपसरपंच फुलाबाई सुतार यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. या पदावर गुरव यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी श्रीपतराव दादा बँकेचे संचालक सुरेश पाटील, कृष्णात पाटील, संजय पाटील, आनंदराव याटील, सदस्य पंढरिनाथ पाटील, प्रकाश पाटील, पोपट कांबळे, सारिका चौगले, आक्काताई चौगले ,भरत चौगले, वैभव गुरव, सचिन गौड, नवनाथ गुरव, आनंदराव गुरव, आदी उपस्थित होते. ग्रामसेवक पी.एस.शेंडूरे पाटील यांनी स्वागत केले. शिवाजी पाटील यांनी आभार मामले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80149 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..