निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन
निधन

निधन

sakal_logo
By

आजच्या पानाच्या बाजूची घेणे

१७६३
तानाजी कसलकर
सेनापती कापशी ः तमनाकवाडा (ता. कागल) येथील तानाजी नाना कसलकर (वय ५१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, आई, असा परिवार आहे. रक्षविसर्जन सोमवारी (ता. २५) आहे.

38075
लक्ष्मीबाई पंडित
वडणगे ः येथील लक्ष्मीबाई बापूसाहेब पंडित (वय ८७) यांचे निधन झाले. त्या वडणगे सेवा संस्थेचे संचालक व माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील बापूसाहेब पंडित यांच्या आई होत. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. जलदान विधी रविवार (ता. २४) आहे.

38079
सुशीला खुर्दांळे
वडणगे ः येथील सुशीला धोंडिराम खुर्दांळे (वय ७४ ) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २४) आहे.

२४८४
सुरेश निकम
टोप : संभापूर (ता. हातकणंगले) येथील सुरेश शंकर निकम (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, नातू असा परिवार आहे.

१२७२
बंडोपंत कचरे
वडणगे ः येथील बंडोपंत बुधू कचरे (वय ८७) यांचे निधन झाले. शाहू नागरी पतसंस्थेचे लिपिक बाबासो कचरे व माजी उपसरपंच एकनाथ कचरे यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २५) आहे.

२२७९
शिवगोंडा पाटील
सिद्धनेर्ली ः येथील शाहू नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी सदस्य शिवगोंडा कृष्णा पाटील यांचे (वय ८४) यांचे निधन झाले. इचलकरंजी नगरपरिषदेचे सहाय्यक मिळकत पर्यवेक्षक श्रीकांत पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २५) आहे.

३०२८
सावित्री शिंदे
राशिवडे बुद्रुक : येळवडे ( ता. राधानगरी) येथील सौ. सावित्री परशराम शिंदे ( वय ८५) यांचे निधन झाले. येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे मुख्याध्यापक शहाजी शिंदे, एसटी चालक सागर व तानाजी शिंदे यांच्या त्या आई होत. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २५) आहे.

38054
कार्तिक यादव
गडहिंग्लज : हिरलगे (ता. गडहिंग्लज) येथील कार्तिक राजाराम यादव (वय 45) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. सोमवारी (ता. 25) सकाळी नऊला रक्षाविसर्जन आहे.

२२८१
भूपाल घराळ
सिद्धनेर्ली ः येथील भूपाल बापू घराळ (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुले असा परिवार आहे.

००४४३
आनंदा हंकारे
असळज : फुलेवाडी येथील आनंदा बाबूराव हंकारे (वय ६२) यांचे निधन झाले. जिल्हा सहकारी बँकेचे ते निवृत्त शाखाधिकारी होत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

००६९६
प्रकाश कांबळे
धामोड : कोते (ता. राधानगरी) येथील प्रकाश भागोजी कांबळे (वय ५९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.

१७५१
साऊबाई खाडे
शिरोली दुमाला : सावर्डे दुमाला (ता. करवीर) येथील साऊबाई तुकाराम खाडे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, चार मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २५) आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80178 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top