
एज्युकेशन पत्रके
38114
मुक्त विद्यापीठातर्फे टिळक जयंती
कोल्हापूर ः यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विभागीय केंद्रात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम झाला. विभागीय केंद्राचे वरीष्ठ शैक्षणिक सल्लागर डॉ. आर. व्ही. कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. कुलकर्णी यांनी यावेळी लोकमान्य टिळक यांच्या कार्याची माहिती दिली.
मिलिंद हायस्कूलमध्ये टिळक जयंती
कोल्हापूर : प्रतिभानगर येथील मिलिंद हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक जयंती साजरी झाली. मुख्याध्यापक एम. एम. शिर्के कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. स्वीटी साठे हिने प्रास्ताविक केले. पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी टिळकांच्या जीवन कार्याची माहिती दिली. व्याख्याते एस. एन. दिंडे यांनी मनोगत व्यक्त केले. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रथमेश माडिमगिरी याने आभार मानले.
...
इंदूमतीदेवी हायस्कूलमध्ये वनसंवर्धन दिन
कोल्हापूर : प्रिन्सेस इंदुमतीदेवी हायस्कूल फॉर गर्ल्समध्ये वनसंवर्धन दिन साजरा झाला. मुख्याध्यापिका शैलजा भोसले यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. हरितसेना विभागप्रमुख सौ. साधना पोवार, सौ. पल्लवी जाधव, सौ. सुनीता लोखंडे, आशा खवाटे, संगीता पोवार, उमा भोसले, सर्व शिक्षिका, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सौ. भोसले यांनी वनसंवर्धनाचे फायदे सांगितले. विद्यार्थिनींनी औषधे, वनस्पतीची रोपे लावली. भूमी कदमने मनोगत व्यक्त केले. हरितसेनेच्या विद्यार्थिनींनी वसुंधरा गीत सादर केले. संस्थेच्या अध्यक्षा सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांचे प्रोत्साहन लाभले.
न्यू प्राथमिक विद्यालयात सभा
कोल्हापूर : न्यू प्राथमिक विद्यालयात पहिली ते दुसरीची पालकसभा झाली. मुख्याध्यापिका सौ. एस. आर. पाटील यांनी सर्व पालकांचे स्वागत केले. शाळेची शिस्त आणि नियमांची माहिती दिली. पालकसभेचे अध्यक्ष सदाशिव बोडके, उपाध्यक्ष माया यादव यांनी शाळेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. शीतल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मीनल गोसावी यांनी आभार मानले.
...
‘कर्मवीर स्कूल’मध्ये वृक्षारोपण
फुलेवाडी : बोंद्रेनगर रिंगरोड येथील मॉडर्न शिक्षण संस्थेच्या ‘शुभंकरोती प्ले स्कूल’ आणि ‘कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूल’तर्फे वृक्षसंवर्धन दिनानिमित्त मुख्याध्यापिका जयश्री गुरव, सुपरवायझर पूनम मुसळे, सुपरवायझर मीरा चौगुले यांच्या हस्ते वृक्षारोपण केले. मुलांनी वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली. तसेच विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व आणि गरज विशद केले. रूपाली निकाडे, सेजल तराळे, अश्विनी पाटील यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सुहासिनी कुंभार, ज्योती लगारे, शुभांगी दमे, अमृता पाटील, प्रियांका धनवडे, लता नायर, विशाल भोरे, सपना खोराटे, रूपाली डोणे, मनीषा पाटील, सीमा किल्लेदार, वैभव लोखंडे, अजिंक्य निकम, संदीप पाटील आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80184 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..