इचल: आवाडे जनता बँके सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल: आवाडे जनता बँके सभा
इचल: आवाडे जनता बँके सभा

इचल: आवाडे जनता बँके सभा

sakal_logo
By

३८०९७

आवाडे बँक मल्टी शेड्यूल्डमध्ये पहिल्या दहात
आमदार प्रकाश आवाडे; ६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
इचलकरंजी, ता.२३ ः स्थापनेपासून कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेने घोडदौड कायम ठेवली आहे. देशातील ३५ मल्टी शेड्युल्ड सहकारी बँकामध्ये बँक दहाव्या क्रमांकावर आहे. पुढील वर्षी या क्रमांकातही सुधारणा होईल, असा विश्वास बँकेचे अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला. श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह येथे आयोजित बँकेच्या ६० व्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
श्री. आवाडे म्हणाले, ‘‘कोरोना काळात ठेवीदार व सभासदांच्या सहकार्याने मार्गक्रमण केले. बँक व्यावसायिकांच्या मागे उभी असल्याने शहरात अत्याधुनिक मागाच्या संख्येत भर पडली आहे. जिल्ह्यातील उद्योजकांना बळ मिळावे म्हणून निर्यातीला चालना देण्यासाठी डीजीएफटी कार्यालय व ड्रायपोर्ट सुरू करण्याचा आपला प्रयत्न आहे.’’
प्रारंभी निधन झालेल्या सदस्य, संचालकांना श्रद्धांजली वाहिली. मुख्य कार्यकरी अधिकारी संजय शिरगावे यांनी सभेमधील १३ विषय वाचून सभासदांची मंजूरी घेतली. तसेच बँकेचा प्रगतीचा आढावा घेतला. २०२१-२२ या आर्थिक वर्षात बँकेस निवळ नफा ११ कोटी ६३ लाखांचा झाला आहे. सभासद संख्या ७० हजार २५१ असून भागभांडवल ६३ कोटी ०.८ लाख, ठेवी २२९० कोटी ४३ लाख तर ४१ कोटी ५५ लाखांचा ढोबळ नफा झाल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, स्वप्निल आवाडे, राहुल आवाडे, किशोरी आवाडे, मौसमी आवाडे, वैशाली आवाडे, अशोक सौंदत्तीकर, बाबासाहेब पाटील, प्रकाश सातपुते, अशोक आरगे, आक्काताई आरगे, अविनाश कांबळे, संजयकुमार अनिलगोळ, महेश सातपुते, योगेश पाटील, इम्रान कलावंत, श्रीशैल कित्तुरे आदी उपस्थित होते. व्हाईस चेअरमन चंद्रकांत चौगुले यांनी आभार मानले.


गेली अडीच वर्षे त्रासाची
शहराच्या विविध समस्या अडीच वर्षापासून राज्य सरकारकडे मांडल्या; मात्र प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे ती अडीच वर्षे अत्यंत त्रासात गेली. आता सत्ता बदल झाल्याने येथून पुढील काळ प्रश्न सोडविण्यासाठी असेल, असे आमदार आवडे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80223 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top