
प्रशासकीय इमारतीसाठी प्रयत्नशील ः हसन मुश्रीफ
38140
गडहिंग्लज : उपनिबंधक कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन करताना हसन मुश्रीफ. शेजारी सतीश पाटील, किरण कदम, उदय जोशी, नेताजी पाटील, शहाजी पाटील आदी.
प्रशासकीय इमारतीसाठी प्रयत्नशील
हसन मुश्रीफ; गडहिंग्लजला उपनिबंधक कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २४ : गडहिंग्लज शहरात सुसज्ज प्रशासकीय भवन उभारणार आहे. प्रशासकीय भवनमुळे प्रांत कार्यालय, तहसील कार्यालयासह सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.
येथील उपनिबंधक कार्यालयाच्या इमारतीसाठी ९८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पोलिस परेड मैदानाशेजारी या इमारतीचे भूमिपूजन आमदार मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘‘उपनिबंधक कार्यालयाला अनेक वर्षापासून पुरेशी इमारत नसल्यामुळे नागरिकांना त्रास होत होता. नव्या इमारतीमुळे तो कमी होईल. न्यायालयाची वगळता अन्य शासकीय कार्यालयांना सुसज्ज इमारती नाहीत. प्रांत व तहसील कार्यालयासाठीही सुसज्ज इमारत व्हावी व सर्वच शासकीय कार्यालय तिथे न्यावीत, यासाठी प्रयत्नशील आहे. पोलिस उपअधीक्षक कार्यालय व पोलिस ठाण्याच्या नव्या इमारतीसाठीही निधी मंजूर केला जाईल.’’
प्रकाश कांबळे यांनी स्वागत केले. माजी नगराध्यक्ष वसंतराव यमगेकर, उपनगराध्यक्ष किरण कदम, उदय जोशी, महेश सलवादे, रामगोंडा ऊर्फ गुंडू पाटील, रश्मीराज देसाई, सिद्धार्थ बन्ने, शर्मिली पोतदार, रेश्मा कांबळे, शारदा आजरी, दीपक कुराडे, अमर मांगले, बाळासाहेब देसाई, नेताजी पाटील, बंटी पाटील, सचिन देसाई, पृथ्वीराज पाटील, शहाजी पाटील, संदीप कागवाडे, जावेद बुडेखान, प्रकाश पाटील, प्रकाश कांबळे, सुनील स्वामी, प्रसाद दड्डीकर, अशोक शिंदे, राकेश सासने, भरत शिंदे आदी उपस्थित होते.
-------------
चौकट...
‘सर्व्हर डाऊन’ची भानगड...
मुश्रीफ म्हणाले, ‘‘ग्रामीण भागातील लोक कामासाठी उपनिबंधक कार्यालयात येतात. पण, कार्यालयाचा सर्व्हर डाऊन होतो. ही सर्व्हर डाउनची काय भानगड आहे, ती काही कळत नाही. या तांत्रिक बाबीतील दोष दूर करणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांची कामे ताबडतोब होऊ शकतील. त्यांचा त्रास कमी होईल.’’
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80276 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..