गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

‘क्रिएटिव्ह’मध्ये जिमखाना निवडणूक
गडहिंग्लज : येथील क्रिएटिव्ह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शालेय जिमखाना निवडणूक झाली. इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी लोकशाही पद्धतीने गुप्त मतदानाचा हक्क बजावला. प्रणाल ढोणुक्षे याची विद्यार्थी प्रतिनिधीपदी तर अनुष्का हरदारे हिची विद्यार्थिनी प्रतिनिधीपदी निवड झाली. प्रथमेश मगदूम (आरोग्यमंत्री), वैष्णवी कांबळे (शिस्तपालनमंत्री), समर्थ रोटे (क्रीडामंत्री), वरदा पोटे (सांस्कृतिकमंत्री) यांचा मंत्रिमंडळात समावेश आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर देसाई, सचिव अण्णासाहेब बेळगुद्री यांनी अभिनंदन केले. मुख्याध्यापक दिनकर रायकर, निवडणूक विभागप्रमुख एस. ए. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली.
-----------------------------
38141
वैष्णवी चव्हाण, अहमद काझी

साई इंटरनॅशनलचा शंभर टक्के निकाल
गडहिंग्लज : येथील साई इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचा (सीबीएसई) निकाल १०० टक्के लागला. बारावीत वैष्णवी चव्हाण
(९५.२० टक्के), ओंकार संकपाळ (९३.४०), हर्ष पाटील (९१.२०), युगंधर पाटील (९०.८०) यांनी अनुक्रमे क्रमांक पटकाविले. तर दहावीमध्ये अहमद काझी याने ९९.४० टक्के गुणासह तालुक्यात पहिला क्रमांक मिळविला. स्वरुप पाटील (९५.६०), विश्‍वा चौगुला (९४.८०), गौरी सरबर (९३.२०), सानिका पाटील (९१.४०), संस्कार रेडेकर (९१.२०), सबिया याकुबशा (९१.२०) यांनी अनुक्रमे क्रमांक पटकाविले. संस्थेचे अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब घुगरे, मुख्याध्यापिका दीपाली कोरडे यांच्यासह शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.
----------------
38142
गडहिंग्लज : पी. सी. पाटील पतसंस्थेतर्फे संभाजी थोरात यांचा सत्कार करताना मधुकर येसणे. शेजारी पद्मजा मेढे, अर्जुन पाटील, बाळासाहेब वालीकर, अनिल बागडी आदी.

पाटील पतसंस्थेला थोरातांची भेट
गडहिंग्लज : येथील पी. सी. पाटील पतसंस्थेला प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य नेते संभाजी थोरात यांनी सदिच्छा भेट दिली. शिक्षक नेते मधुकर येसणे यांनी स्वागत केले. पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वालीकर यांनी पतसंस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. थोरात म्हणाले, ‘‘सभासदांच्या विश्‍वासाला पात्र राहून स्वच्छ व पारदर्शक कारभार करणाऱ्या या पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे. पतसंस्थेच्या आदर्श कारभाराची राज्यस्तरावरुन दखल घेतली जाईल.’’ शिक्षक बँकेचे नूतन अध्यक्ष अर्जुन पाटील, उपाध्यक्षा पद्मजा मेढे, नूतन संचालक नंदकुमार वाईंगडे यासह संचालक व शिक्षक उपस्थित होते. उपाध्यक्ष अनिल बागडी यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80277 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..