अमर चव्हाण यांचा आज वाढदिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमर चव्हाण यांचा आज वाढदिवस
अमर चव्हाण यांचा आज वाढदिवस

अमर चव्हाण यांचा आज वाढदिवस

sakal_logo
By

38183
अमर चव्हाण

अमर चव्हाण यांचा आज वाढदिवस
गडहिंग्लज, ता. २४ : पंचायत समितीचे माजी सभापती व संजय गांधी निराधार योजना समितीचे तालुकाध्यक्ष अमरसिंह चव्हाण यांचा उद्या (ता. २५) विविध उपक्रमांनी वाढदिवस साजरा होत आहे. वृक्षारोपण आणि विविध उप्रकमांसह सायंकाळी चार वाजता आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते नागरी सत्काराचा कार्यक्रम होणार आहे.
चन्नेकुप्पी (ता. गडहिंग्लज) येथील अमर चव्हाण यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघात राजकारण व समाजकारणात स्वकर्तृत्वाने अल्पावधीत वेगळा ठसा उमटविला. राष्ट्रवादीचे समर्थक चव्हाण २०१२ मध्ये केवळ जनतेच्या सहानुभूतीच्या लाटेवर अपक्ष म्हणून पं. स. निवडणुकीत विजयी झाले. अपक्ष निवडून आलेल्या चव्हाण यांना सभापतीपदी बसविण्याचे ऐतिहासिक कार्य राष्ट्रवादीने केले. त्यावेळी तालुका पिंजून काढत शासनाच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचवण्यात त्यांना यश आले. २०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत काही मतांनीच झालेल्या पराभवाने न खचता त्यांनी समाजकारण व राजकारणात सातत्य ठेवले. दरम्यान, गोडसाखरच्या संचालकपदी ते निवडून आले. कारखान्याच्या कामगारापासून पं. स. सभापती, गोडसाखर संचालक आणि संजय गांधी योजना समितीच्या अध्यक्षपदापर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास संघर्षमय असा राहिला.
दरम्यान, गतवर्षी गोडसाखर सुरू करण्याच्या मुद्यावरुन कारखान्यातील अंतर्गत राजकारण तापले. मात्र चव्हाण यांनी केवळ शेतकरी व कामगार हितासाठी आपल्या राजकीय पक्षाचे जोडे बाहेर ठेवून आर्थिक अडचण असूनही कारखाना सुरु करण्याच्या क्रांतीकारक निर्णयात पुढाकार घेतला. संस्था व लोकांकडून ठेवी गोळा करुन अल्पकालावधी का असेना कारखाना स्वबळावर सुरू करण्यात यश आले. एक तपाच्या राजकीय कारकिर्दीत विविध संघर्षात तावून सुलाखून निघालेल्या चव्हाण यांचा वाढदिवस पहिल्यांदाच व्यापक स्वरुपात साजरा होत आहे. चन्नेकुप्पीत सिद्धेश्‍वर मंदिरात उद्या सायंकाळी चार वाजता आमदार पाटील यांच्या हस्ते त्यांचा नागरी सत्कार होत आहे. विविध उपक्रमही यावेळी होणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80323 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..