राज्य प्राथमिक शिक्षण समितीच्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य प्राथमिक शिक्षण समितीच्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम
राज्य प्राथमिक शिक्षण समितीच्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम

राज्य प्राथमिक शिक्षण समितीच्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम

sakal_logo
By

38219

राज्य प्राथमिक शिक्षण समितीच्या
वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम
इचलकरंजी : येथील राज्य प्राथमिक शिक्षण समिती शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम झाले. शाळा स्तरावर आयोजित रंगभरण स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत महापालिका शाळा आणि खासगी अनुदानित प्राथमिक शाळेतील सुमारे नऊ हजार विद्यार्थी सहभागी झाले. शाळा स्तरावर स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची पारितोषिके देण्यात आली. रोटरी क्लबच्या सहकार्याने श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात शिक्षकांसाठी आरोग्य शिबिर झाले. संजय देमाण्णा, अरविंद शेळके, विद्या कांबळे, अशोक जैन, दिलशाद मुजावर, यासीन मणेर, प्रशांत गुरव, प्राचार्या त्रिशला कदम, लक्ष्मण कांबरे आदी उपस्थित होते.
------
38221
न्यू हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार
इचलकरंजी : दि न्यू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात एनएमएमएस परीक्षा पात्र विद्यार्थ्यांना सारथी शिष्यवृत्तीचा लाभ मिळाल्याबद्दल सत्कार झाला. साई जाधव व निखिल कागवाडे या विद्यार्थ्यांना सारथी शिक्षण संस्थेतर्फे बारावीपर्यंत दरवर्षी नऊ हजार ६०० रुपये याप्रमाणे ३८ हजार ४०० रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. संस्थेचे चेअरमन अरुण खंजिरे, सचिव बाळकृष्ण मुरदंडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, मुख्याध्यापक एस. ए. पाटील, सौ. आर. एस. पाटील, एम. जी. आंबेकर यांचाही सत्कार करण्यात आला.
------------
38220
कन्या महाविद्यालयात सहविचार सभा
इचलकरंजी : श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात शिक्षक, पालक, विद्यार्थिनी सहविचार सभा झाली. ज्युनिअर विभागातर्फे शाळासिद्धी उपक्रमांतर्गत सभेचे आयोजन केले होते. शिक्षक आणि पालकांमध्ये विद्यार्थिनी दुवा असतात. त्यांच्यात सुसंवाद असल्यास विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास घडतो, असे मत प्रा. एस. आर. बोरगावकर यांनी व्यक्त केले. स्वानंदी तोरणे, साक्षी चव्हाण या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. श्रीमती जयश्री सुतार, राजू भिसे, महेश रावळ आदींनी मते मांडली. विद्यार्थिनींची सुरक्षा, त्यांच्या कलागुणांना वाव देणारे उपक्रम महाविद्यालयात राबविले जात असल्याची माहिती अध्यक्षीय भाषणातून प्राचार्या डॉ. त्रिशला कदम यांनी दिली. प्रा. अनिल कुंभार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. एकता जाधव यांनी आभार मानले. मनीषा गवळी यांनी सूत्रसंचालन केले.
-------------
माजी विद्यार्थी मेळावा गुरुवारी
इचलकरंजी : येथील डीकेएएससी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा आणि माजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार माजी विद्यार्थ्यांतर्फे आयोजित केला आहे. महाविद्यालयाच्या माध्यमातून घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करीत आहेत. अशा उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार व माजी विद्यार्थी मेळावा होईल. गुरुवारी (ता. २८) सकाळी अकराला महाविद्यालयाच्या सभागृहात हा मेळावा होणार आहे. मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन माजी विद्यार्थी संयोजन समितीने केले.
-------------
‘गिरिभ्रमण’च्या पदभ्रमंती मोहिमेचा प्रारंभ
इचलकरंजी : गिरिभ्रमण संघटनेच्या राज्यस्तरीय पदभ्रमंती मोहिमेची सुरुवात शिवतीर्थ येथून केली. स्वप्नील आवाडे, सहायक पोलिस निरीक्षक विकास आडसूळ, गजानन महाजन गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. पन्हाळा ते पावनखिंड या पदभ्रमंती मोहिमेत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यांतील शेकडो शिवभक्त सहभागी झाले आहेत. सचिन वरपे, संजय हजारे, राजू ढपाले, मधू गुरव, सचिन कांबळे, संदीप चव्हाण आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80358 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top