
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या
होरायझनची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम
गडहिंग्लज : औरनाळ (ता. गडहिंग्लज) येथील न्यू होरायझन स्कूलचा दहावी सीबीएसईचा निकाल शंभर टक्के लागला. सलग आठव्या बॅचचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विश्वराज चव्हाण (९६.४० टक्के), दिशिता पाटील (९५.८०), राजश्री बनगे (९५.६०), प्रतीक्षा चौगुले (९४.२०), ओम येसणे (९४.२०) यांनी अनुक्रमे क्रमांक मिळविले. संस्थेच्या अध्यक्षा रत्नमाला घाळी, कार्याध्यक्ष सतीश घाळी यांचे प्रोत्साहन मिळाले. मुख्याध्यापिका सुनीता पाटील यांच्यासह शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.
----------------
gad247.JPG
औरनाळ : पार्वती हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण प्रसंगी अनिकेत कोकाटे, उमेश सावंत, डॉ. श्रीकांत मुसळे, तुकाराम भोसले आदी.
औरनाळमध्ये विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
गडहिंग्लज : औरनाळ (ता. गडहिंग्लज) येथील पार्वती हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांकडून शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. शाळेचे माजी विद्यार्थी व सध्या भारतीय सैन्य दलात कार्यरत असणारे अनिकेत कोकाटे यांनी विद्यार्थ्यांसाठी वह्या-पेन्स, दोन फुटबॉल, दोन बास्केटबॉल, नेट देणगी दिले. शाळेतील गरजू ४५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळेतर्फे अनिकेत कोकाटे यांचा सत्कार करण्यात आला. उमेश सावंत यांनी प्रास्ताविक केले. माजी विद्यार्थी डॉ. श्रीकांत मुसळे यांचे भाषण झाले. माजी विद्यार्थी तुकाराम भोसले, सुनील भोसले, आनंदा पन्नोरे, अनिल पोवार यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. व्ही. आर. रेपाळ यांनी सूत्रसंचालन केले. बी. जी. कुंभार यांनी आभार मानले.
-----------------
38146
नूल : रामलिंग हायस्कूलमध्ये शालेय जिमखाना निवडणूक प्रसंगी आर. के. शिंदे, आर. ए. गायकवाड, पी. एस. काकडे यांच्यासह विद्यार्थी.
‘रामलिंग’मध्ये जिमखाना निवडणूक
नूल : येथील रामलिंग हायस्कूलमध्ये शालेय जिमखाना निवडणूक झाली. लोकशाही पद्धतीने निवडणुकीची सारी प्रक्रिया पार पडली. सुदर्शन मास्तोळी याची विद्यार्थी प्रतिनिधीपदी, तर ऐश्वर्या कारतगे हिची विद्यार्थिनी प्रतिनिधीपदी निवड झाली. प्रांजल सूर्यवंशी सांस्कृतिक मंत्री, साक्षी बाळेशगोळ प्रार्थना मंत्री, अदित्य सुपले क्रीडा मंत्री, प्रमोद हेशागोळ वाचनालय मंत्री, स्नेहल कदम आरोग्य मंत्री, अंजली कांबळे सहल मंत्री म्हणून निवडून आली. मुख्याध्यापक आर. के. शिंदे यांनी झोनल अधिकारी-१, आर. ए. गायकवाड यांनी झोनल अधिकारी-२, पी. एस. काकडे यांनी केंद्राध्यक्ष, एम. टी. मांगले यांनी विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80393 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..