करवीर तहसिल पायाभरणीपूर्वीच वादात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करवीर तहसिल पायाभरणीपूर्वीच वादात
करवीर तहसिल पायाभरणीपूर्वीच वादात

करवीर तहसिल पायाभरणीपूर्वीच वादात

sakal_logo
By

पायाभरणी पूर्वीच नवी इमारत वादात
करवीर तहसीलची वास्तू हेरिटेज; पर्यायी ठिकाणी जागा शोधावी लागणार

लुमाकांत नलवडे ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः करवीर तहसील कार्यालयाच्या नव्या इमारतीची पायाभरणी होण्यापूर्वीच ती वादात अडकली आहे. ही वास्तू शंभर वर्षांपूर्वीची आहे. ती हेरिटेज आहे. त्यामुळे तेथे कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये, अशी तक्रार पुढे आली आहे. येथील बांधकाम करताना शेजारील पुराभिलेख विभागाच्या इमारतीला धक्का लागू शकतो, असाही तक्रारीचा सूर आहे. त्यामुळे पायाभरणी पूर्वीच नवी इमारत वादात सापडली आहे.
कोल्हापूर शहरातील बहुतांशी भाग हा करवीर तहसील कार्यालयात मोडतो. याच तहसील कार्यालयाची इमारत भाऊसिंगजी रोडला कोंदट वातावरणात आहे. तेथे पार्किंगची व्यवस्था नाही. अनेक नागरिकांचा येथे राबता असतो. सांडपाण्यातून वाट काढून कार्यालयात पोचावे लागते. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी कार्यालयाची नवीन इमारत बांधण्याचा निर्णय झाला. त्यासाठी सुमारे १४ कोटींचाही निधी मिळाला. मात्र, या कार्यालयाच्या इमारतीच्या कामाला सुरुवात होण्यापूर्वीच ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ज्या वास्तूला ऐतिहासिक संदर्भ आहेत. जी वास्तू शंभर वर्षांपूर्वीची आहे, त्या वास्तूला हेरिटेज मानले जाते. ती वास्तू हेरिटेज वास्तूंच्या यादीत असो किंवा नसो. त्या वस्तूचे संवर्धन केले पाहिजे, असा आग्रह इतिहास तज्ज्ञांनी धरला आहे. ही इमारत उभी करू नये, शहरात शासनाच्या अनेक रिकाम्या जागा आहेत. त्या ठिकाणी प्रशस्त पार्किंगसह ही इमारत उभी रहावी. सध्या मूळ हेरिटेज असलेली वास्तू पाडून पुन्हा उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे तातडीने थांबवावेत. तत्कालीन हेरिटेज कमिटीच्या अध्यक्षांकडे तसा आक्षेप इतिहास तज्ज्ञांनी ही नोंदविला आहे. त्यामुळे आता ही वास्तू हेरिटेज असेल तर तेथे बांधकाम करणे अशक्य आहे. याबाबत कोणाचा आक्षेप असल्यास त्याच्याही नोंदणीची जाहिरात प्रसिद्धी केली आहे. त्यामुळे निधी येऊनही आहे त्या ठिकाणी इमारत उभी करणे अशक्य होत असल्याचे चित्र आहे.
(पूर्वाध)

कोट
करवीर तहसील कार्यालयाची इमारत हेरिटेज आहे. त्या शेजारीच पुराभिलेख कार्यालयाची इमारत आहे. मुळात हेरिटेज इमारत पाडून पुन्हा बांधण्याची गरज नाही. तसेच त्या इमारतीचे बांधकाम सुरू असता शेजारील पुराभिलेख कार्यालयाच्या इमारतीला धक्का पोचू शकतो. परिणामी पर्यायी ठिकाणी प्रशस्त जागेत पार्किंगसह सुसज्ज इमारत उभी करावी. आहे त्या ठिकाणी इमारत उभी करू नये.
-इंद्रजित सावंत, इतिहासतज्ज्ञ

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80400 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..