
निधन वृत्त
निधन वृत्त
38274
डॉ. संजय सास्ते
कोल्हापूर, ता. २४ ः बुलढाणा येथील रहिवासी डॉ. संजय शेनपड सास्ते (वय ७८) यांचे अमेरिकेत निधन झाले. मुंबईच्या जे. जे. रुग्णालयाचे ते निवृत्त वैद्यकीय अधीक्षक होते. १९८२ पासून त्यांचे वास्तव्य अमेरिकेत होते. तत्पूर्वी त्यांनी इंग्लडमध्येही काही काळ वैद्यकीय सेवा दिली. येथील चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष व हॉटेल व्यावसायिक आनंद माने यांचे ते मेव्हुणे तर माजी खासदार कै. शंकरराव माने यांचे ते जावई होत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
38350
विठाबाई सोनाळकर
कोल्हापूर ः निगवे खालसा (ता. करवीर) श्रीमती विठाबाई ज्ञानदेव सोनाळकर (वय ८३) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन सोमवार (ता. २५) त्यांच्या मागे एक मुलगा, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
03567
विलासराव पाटील
जयसिंगपूर : संभाजीपूर (ता. शिरोळ) येथील विलासराव शंकर पाटील-खोचीकर (वय ८१) यांचे निधन झाले. संभाजीपूर ग्रामपंचायत उभारणीत त्यांचे मोठे योगदान होते. कोल्हापूर जिल्हा तंबाखू संघ तसेच शेतकरी संघ या संस्थेत त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली होती. कन्सेप्ट इंजिनियर वर्क्सचे मालक सुनील पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २५) आहे.
01837
चंदर निर्मळे
हुपरी : इंगळी येथील नवीन वसाहतीमधील चंदर देवू निर्मळे (वय ७२) यांचे निधन झाले. माजी उपसरपंच पुतळाबाई निर्मळे यांचे ते पती होत. त्यांच्या मागे दोन मुले, दोन भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार (ता. २५) आहे.
00026
मारुती कमते
रांगोळीः येथील मारुती कृष्णा कमते (वय ७३) यांचे निधन झाले. रांगोळी ‘सकाळ'' बातमीदार संतोष कमते यांचे ते चुलते व सोंगीभजनी कलाकार किरण कमते यांचे वडील होत. त्यांच्या मागे मुले,सूना,व नातवंडे असा परिवार आहे.
01956
हरी मोरे
पोहाळे तर्फ आळते ः येथील हरी कृष्णा मोरे (वय ९०) यांचे निधन झाले. पोहाळे सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष व समर्थ समूहाचे सदस्य पंढरीनाथ मोरे यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे मुलगा तीन मुली सून नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. २६ ) आहे.
38295
बाळकृष्ण जाधव
कोल्हापूर : उत्तरेश्र्वर पेठ येथील बाळकृष्ण नामदेव जाधव (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, सूना, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.
38299
विजयमाला साळोखे
कोल्हापूर : बिंदू चौक, बागवान गल्ली येथील श्रीमती विजयमाला बाळासाहेब साळोखे (वय ८६) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २५) आहे.
38301
जैद तांबोळी
कोल्हापूर : धनवडे गल्ली, शुक्रवार पेठ येथील जैद शब्बीर तांबोळी (वय २४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे वडील, आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
38306
मीनाज ऐतवडे
कोल्हापूर : उचगाव येथील मीनाज दस्तगीर ऐतवडे (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
38312
बाळूमामा गोठणकर
कोल्हापूर : साने गुरुजी वसाहत येथील नारायण ऊर्फ बाळूमामा गोठणकर (वय ९५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २५) आहे.
02152
प्रकाश नायकवडी
खोची : पेठवडगाव येथील हारविक्रेते प्रकाश राजाराम नायकवडी -सायबा (वय ५५) यांचे निधन झाले. ते शंकर नायकवडी यांचे भाऊ तसेच बळवंतराव यादव विद्यालयाचे शिक्षक संदीप नायकवडी यांचे चुलते होत. त्यांच्या मागे भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता.२५) आहे.
38341
रामराव चव्हाण
कोल्हापूर : श्रीमंत रामराव यादवराव चव्हाण-हिम्मतबहाद्दर (सोनीकर) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80435 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..