
पाडळी खुर्दमधील शाळा नवीनच उभारावी
नवीन इमारत उभारण्याचाच पर्याय
पाडळी खुर्दमधील शाळा शंभरी पार; भिंतीतून पडते माती
सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
बालिंगा, ता. २४ : शाळा सुरू असताना भिंतीतून माती पडते. जोराचा पाऊस आल्यानंतर पाझरलेलं पाणी फरशीतून वर येते. त्यामुळे १०० वर्षे पूर्ण झालेली पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील शाळा दुरूस्ती पलीकडे गेली आहे. त्यामुळे या शाळेची वास्तू नवीनच उभारल्याशिवाय पर्याय नससल्याचे चित्र आहे.
पाडळी खुर्द येथील जिल्हा परिषदेची शाळेला शंभर वर्षे होऊन गेले आहेत. प्रत्येक वर्षी शाळेची काहींना काही डागडूजी करावी लागते. यातच याच शाळेचा पटांगणात उभारलेली षटकोनी शाळा बिनकामाची ठरली आहे. याचा विद्यार्थांना काहीही उपयोग होत नाही. थोडा जरी पाऊस सुरू झाला तर गळीत सुरू होते. अशामध्ये विद्यार्थांना जीव मुठीत घेऊनच शिक्षण घ्यावे लागत आहे. शंभर वर्षे पूर्ण झालेल्या शाळेची इमारत आता डागडुजीने सुधारणारी नाही, तर ही पूर्णच इमारत नव्याने उभारावी लागणार आहे. गावातील शेकडो विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. अनेकांना या शाळेचा मोठा आधार आहे. एकीकडे खासगी शाळांमध्ये महागडे शिक्षण परवडत नसणाऱ्या विद्यार्थांना या शाळेतून चांगले शिक्षण घेता येत आहे. मात्र, मुलांचा जीव धोक्यात घालून शिक्षण देणे आणि घेणे त्रासदायक ठरत आहे.
गावात जिल्हा परिषदेची शाळा गरजेची आहे. विद्यार्थांची संख्याही चांगली आहे. पालकांना या शाळेतील शिक्षणावर विश्वास आहे. चांगले आणि दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी पालकांची इच्छा असते. आता शाळा दुरुस्ती नको तर नवीनच वास्तू उभारावी, अशी मागणी होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नवीन इमारत बांधण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे.
कोट
पाडळी खुर्दमधील जिल्हा परिषदेच्या शाळेची वारंवार डागडुजी केली जाते. मात्र, याचा काहीही उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. शाळा सुरू असताना अनेक वेळा भिंतीतून माती पडणे किंवा छताचा लाकडी भुसा पडणे सुरूच असते. त्यामुळे शाळा नवीन बांधल्याशिवाय पर्याय नाही.
- अवधूत पाटील, अमित कांबळे,
संदीप कांबळे, पाडळी खुर्द
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80444 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..