ट्रायलच्या बहाण्याने दुचाकी चोरी-अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रायलच्या बहाण्याने दुचाकी चोरी-अटक
ट्रायलच्या बहाण्याने दुचाकी चोरी-अटक

ट्रायलच्या बहाण्याने दुचाकी चोरी-अटक

sakal_logo
By

38349

दुचाकी पळविणारा चोरटा अटकेत
‘ट्रायल’च्या बहाण्याने नेली गाडी ; २ लाख १५ हजाराचा मुद्देमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ - विक्री करण्यासाठी असलेल्या दुचाकीची ट्रायल पाहतो, म्हणून लंपास केलेल्या मोटारसायकल चोरट्यास शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. यासीन अब्दुल मुल्ला (वय २९, घोडके मळा, इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद नागाळा पार्क येथील डॉ.नईम नजीर मुजावर यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली होती. २ लाखांची दुचाकी आणि मोबाइल हॅण्डसेट असा सुमारे दोन लाख पंधरा हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी सांगितले, डॉ. मुजावर हे नागाळापार्क येथील अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांची दुचाकी विक्री करण्‍यासाठी त्यांनी फेसबुक आणि ऑनलाईनवर जूनमध्ये जाहिरात दिली होती. २८ जूनला त्यांना एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन आला. ‘तुमची गाडी घ्यायची आहे, कोठे पाहायला मिळेलल'', अशी विचारणा केली. तेंव्हा मुजावर यांनी घरी येण्यास सांगितले. २९ जूनला ती व्यक्ती घराजवळ आली. तेथे त्यांने ट्रायल पाहण्यासाठी दुचाकी घेवून गेला. त्यानंतर तो परत आलाच नाही. त्यामुळे मुजावर यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी ज्या मोबाइल क्रमांकावर कॉल आला होता, त्याचे नाव आणि पत्ता शोधला. तेंव्हा तो एका रिक्षाचालकांचा फोन असल्याचे दिसून आले. प्रवाशांने माझ्या मोबाइलवरून एक कॉल केला होता. असे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांपुढे तपासाचे आव्हान तयार झाले. अखेर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास सुरू केला. तेंव्हा संशयित हा सांगली फाट्यावरून सांगलीकडे गेल्याचे दिसून आले. त्यानंतरही पोलिसांनी पुढे सीसीटीव्हीद्वारे तपास केला तेंव्हा ती व्यक्ती इंचलकरंजीकडे गेल्याचे दिसून आले. पोलिसांनी इचलकरंजीत शोध घेतला मात्र अपेक्षीत यश आले नाही. अखेर ती दुचाकी एका गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी त्या गॅरेजमध्ये जावून गाडी जप्त केली. तेव्हा संशयित आरोपी हा इचलकरंजीतील असून त्याचा शोध लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून अधिक चौकशी केली असता त्यांनेच ही दुचाकी नेल्याचे पोलिसांच्या तपासात दिसून आले.
पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले, हेड कॉन्स्टेबल ऋषीकेश पवार,नाईक युवराज पाटील, मिलिंद बांगर, पोलिस कॉस्टेबल शुभंम संकपाळ, लखन पाटील, सागर माने आदींनी तपास केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80491 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top