चंद्रकांत पाटील मातृ शोक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रकांत पाटील मातृ शोक
चंद्रकांत पाटील मातृ शोक

चंद्रकांत पाटील मातृ शोक

sakal_logo
By

38351

चंद्रकांत पाटील यांच्या
मातोश्रींचे निधन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती बच्चू पाटील (वय ९१) यांचे आज दुपारी निधन झाले. पंचगंगा स्मशानभूमीत मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे एक मुलगा, सून, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविर्सजन सोमवारी (ता. २५) सकाळी ९ वाजता होईल.
सरस्वती पाटील यांनी अत्यंत कष्‍टाने पाटील कुटुंबीयांचे पालनपोषण केले. मुलांना शिक्षणाबरोबरच त्यांनी मेहनतीचे आणि सामाजिक जाणिवेतून इतरांना मदत करण्याचे संस्कार दिले. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. चंद्रकांत पाटील यांच्या सर्व सामाजिक व राजकीय कारकिर्दीत त्या ठामपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. गेल्या दहा वर्षांपासून त्यांचे वास्तव्य चंद्रकांत पाटील यांच्या नाळे कॉलनीतील बंगल्यात होते. आठवडाभरापासून त्या आजारी होत्या, आज दुपारी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. ‘आई काही दिवसांपासून आजारी होती. आज दुपारी ती देवा घरी गेली.’ अशी पोस्ट चंद्रकांत पाटील यांच्या फेसबुक वरून पाहायला मिळाली. त्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी दादांच्या घरी गर्दी केली. सर्व नातेवाईक व कार्यकर्त्यांनी पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतर रात्री आठच्या सुमारास निवासस्थानावरून अंत्ययात्रा निघाली. पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
आमदार प्रकाश आवाडे यांनी सर्वांच्या वतीने श्रद्धांजली वाहिली. या वेळी माजी आमदार अमल महाडिक, सुरेश हाळवणकर, चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, गोकुळ संचालक अरुण डोंगळे, माजी नगरसेवक प्रा. जयंत पाटील, सत्यजित कदम, अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, किरण नकाते, सुनील मोदी, राहुल चिक्कोडे, विजय जाधव, हेमंत आराध्ये, मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंत मुळीक, कामगार नेते रघुनाथ कांबळे, ॲड. बाबा इंदुलकर, रिपब्लिकन पार्टीचे उत्तम कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80518 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..