
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या
38456
औरनाळ : पार्वती हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण प्रसंगी अनिकेत कोकाटे, उमेश सावंत, डॉ. श्रीकांत मुसळे, तुकाराम भोसले आदी.
औरनाळमध्ये विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
गडहिंग्लज : औरनाळ (ता. गडहिंग्लज) येथील पार्वती हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांकडून शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. शाळेचे माजी विद्यार्थी व सध्या भारतीय सैन्य दलात कार्यरत असणारे अनिकेत कोकाटे यांनी विद्यार्थ्यांसाठी वह्या-पेन, दोन फुटबॉल, दोन बास्केटबॉल, नेट देणगी दिले. शाळेतील गरजू ४५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळेतर्फे अनिकेत कोकाटे यांचा सत्कार करण्यात आला. उमेश सावंत यांनी प्रास्ताविक केले. माजी विद्यार्थी डॉ. श्रीकांत मुसळे यांचे भाषण झाले. माजी विद्यार्थी तुकाराम भोसले, सुनील भोसले, आनंदा पन्नोरे, अनिल पोवार यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. व्ही. आर. रेपाळ यांनी सूत्रसंचालन केले. बी. जी. कुंभार यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80522 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..