कचरा विकेंद्रीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कचरा विकेंद्रीकरण
कचरा विकेंद्रीकरण

कचरा विकेंद्रीकरण

sakal_logo
By

38355
-


दररोज ४०० युनिट वीज निर्मिती

पुईखडी कचरा प्रक्रिया प्रकल्प ः तीन प्रभागांतून संकलन; अर्धा टन खतही उपलब्ध

उदयसिंग पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ ः पुईखडी परिसरातील वाढत्या नागरिकरणामुळे तिथे विकेंद्रित कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात आला. सध्या दररोज प्रक्रिया होणाऱ्या पाच टन कचऱ्यातून ३०० क्युबिक मीटर बायोगॅसची निर्मिती होत आहे. या गॅसद्वारे ४०० युनिट वीज तयार होण्याबरोबरच दररोज ५०० किलो खतही उपलब्ध होत आहे. त्यामुळे परिसरातील तीन प्रभागांतील कचरा उठावचा प्रश्‍न निकाली निघाला आहे.
पाच वर्षांपूर्वी हा प्रकल्प प्लॅनेट एन्व्हार्यमेंट कंपनीने सुरू केला. आठ हजार चौरस फूट क्षेत्रात असलेल्या या प्रकल्पात क्रांतिसिंह नाना पाटील, जिवबा नाना जाधव पार्क या परिसरातील तीन प्रभागांतील कचरा येतो. २० टिपर विलगीकरण केलेला कचरा आणतात. त्याचे या प्रकल्पात पुन्हा विलगीकरण केले जाते. त्यानंतर विघटन होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया सुरू होते. दिवसभरात येणाऱ्या कचऱ्यामुळे ३०० क्युबिक मीटर बायोगॅस तयार होतो. या गॅसच्या माध्यमातून वीज निर्मिती केली जात आहे. ही वीज स्ट्रिट लाईटसाठी देता येऊ शकते. सध्या या प्रकल्पाला चालवण्यासाठीच वीज वापरली जात असल्याने विजेबाबतीत हा प्रकल्प स्वयंपूर्ण आहे.
वीज निर्मिती होऊन कचऱ्याचा उपयोग थांबत नाही. गॅस तयार होणाऱ्या टाकीतून बाहेर पडणाऱ्या कचऱ्याचा चोथा हा उत्तम पद्धतीचे खत आहे. दररोज ५०० किलो खत तयार होत आहे. सध्या महापालिकेच्या उद्यानांसाठी हे खत वापरले जात आहे. मोठ्या प्रमाणावर प्रकल्प राबवले गेल्यास त्यातून निर्माण होणाऱ्या खताची विक्रीही करता येऊ शकते. प्रकल्प उभा करून पाच वर्षे चालवण्याचे कंत्राट कंपनीला दिले आहे.
(पूर्वार्ध).

कोट
या परिसरात आणखी प्रकल्प उभे करता येऊ शकतील. शहरात एकाच ठिकाणी कचरा संकलित करून प्रक्रिया करण्यापेक्षा विकेंद्रित प्रकल्प महापालिकेच्या दृष्टीने फायदेशीर ठरतात.
नियाज अत्तार, इनचार्ज, प्लॅनेट एन्व्हार्यमेंट.
...
चौकट
दृष्टिक्षेपात...
-८ हजार चौरस फूट जागा
-पाच टन कचऱ्यावर प्रक्रिया
-दररोज ६ कर्मचाऱ्यांकडून काम
---
चौकट
आणखी प्रकल्प उभे करण्याची गरज
लोकसंख्या वाढेल तशी नागरी वस्ती पसरत आहे. घराघरांतून निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर एकाच ठिकाणी प्रक्रिया करण्यासाठी वेळ, पैसा खर्च होऊनही अनेकदा समस्या निर्माण होत आहेत. कचऱ्याचे ढिग साचत आहेत. अविघटनशील कचऱ्याचा प्रश्‍न तयार होतो. वाहतुकीवर जादा खर्च करावा लागतो. या साऱ्यावर मात करण्यासाठी महापालिकेने पाच वर्षांपूर्वीपासून विकेंद्रित कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केले. दोन ठिकाणी सुरू झालेल्या प्रकल्पांना गती आली असून दररोज सात टन कचऱ्यावर भागातच प्रक्रिया होऊन वीज व खत निर्मिती केली जात आहे. शहरात असे आणखी प्रकल्प उभे करण्याची आवश्‍यकता असून त्यातून कचरा संकलन, प्रक्रिया, विल्हेवाटीदरम्यानचे प्रश्‍न निकाली निघण्यास मदत होईल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80530 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..