करवीर- तात्पुरर्ते स्थलांतरही शक्य होत नाही.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करवीर- तात्पुरर्ते स्थलांतरही शक्य होत नाही..
करवीर- तात्पुरर्ते स्थलांतरही शक्य होत नाही..

करवीर- तात्पुरर्ते स्थलांतरही शक्य होत नाही..

sakal_logo
By

नागरिकांचे हाल थांबणार कधी?
स्थलांतराचा मुद्दाच दुर्लक्षित; निधीला मंजुरी, निर्णयाला विलंब

लुमाकांत नलवडे ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ ः करवीर तहसील कार्यालयातून तब्बल १३२ गावांचा कारभार चालतो. त्यासाठी रोज हजारो नागरिकांची या कार्यालयाला भेट होत असते. त्यामुळे हे कार्यालय प्रशस्त जागेत आणि पार्किंगची सुविधा असणाऱ्या ठिकाणी आवश्‍यक आहे. गेल्या दीड वर्षात तहसील कार्यालयाचे तात्पुरते स्थलांतर करण्यासाठी जागा उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे कायमस्वरुपी जागा मिळण्यासाठी अजून किती दिवस जाणार, असाही प्रश्‍न आहे. त्यामुळे आमदार आणि जिल्हाधिकारी यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक तातडीने घेऊन तहसील कार्यालयाच्या इमारतीबाबत निर्णय घेणे अपेक्षित आहे.
सध्याचे तहसील कार्यालय शहरातील वर्दळीच्या ठिकाणी आहे. येथे पायी जाण्यासाठीही वाट काढणे मुश्‍कील होते. तेथेच करवीर पोलिस ठाणेही आहे. सांडपाण्यातून वाट काढून कार्यालयात जाणे म्हणजे शिक्षा दिल्यातील प्रकार होतो. त्यामुळेच या कार्यालयाचे नूतनीकरण करून प्रशस्त इमारत उभी करण्याचा निर्णय झाला. १४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत; मात्र येथे बांधकाम सुरू होण्यापूर्वीच ही इमारत हेरिटेज असल्याचा दावा इतिहास संशोधकांनी केला आहे. त्याबाबतची तक्रारही केली आहे. त्यामुळे आता हाच नकाशा पर्यायी जागेमध्ये ठेवून प्रशस्त इमारत उभी करता येणे शक्य आहे. त्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने होणे आवश्‍यक आहे. कार्यालय तात्पुरते स्थलांतरित करण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. कायमस्वरुपी जागा कधी मिळणार असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे. त्यामुळे याकडे नागरिकांचा प्रश्‍न म्हणून पाहण्याची गरज आहे.
सध्या असलेल्या एक एकर जागेतील हे कार्यालय पुन्हा दुसरीकडे उभे करताना किमान दीड-दोन एकर जागेचा विचार होणे आवश्‍यक आहे. भविष्यात येथील कार्यभार वाढत राहणार आहे. त्यामुळे त्याचा विचार करून जागा निश्‍चित होणे अपेक्षित आहे. येथे रोज नागरिकांना अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे.
(उत्तरार्ध)

चौकट
शेंडापार्कचाही पर्याय
शेंडापार्क येथे काही जागेत करवीर तहसील कार्यालय स्थलांतरित करता येणे शक्य असल्याचे प्रथमदर्शनी सरकारी कार्यालयातून सांगण्यात येते. भविष्यात शेंडापार्क परिसर शहराचे मध्यवर्ती ठिकाण होणार आहे. १३२ गावांचा विचार करता रिंग रोडही उपलब्ध आहे. त्यामुळे सध्या असलेला निधी आणि नकाशा शेंडापार्क येथे निश्‍चित करून तेथेच तातडीने इमारतीचे बांधकाम होऊ शकते, असेही सांगण्यात येते. याबाबत आमदारांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यास जागा निश्‍चितीसह अन्य पर्याय पुढे येऊ शकतील.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80540 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top