९२ नगरपालिकांतील ‘ओबीसीं’ना हुरहूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

९२ नगरपालिकांतील ‘ओबीसीं’ना हुरहूर
९२ नगरपालिकांतील ‘ओबीसीं’ना हुरहूर

९२ नगरपालिकांतील ‘ओबीसीं’ना हुरहूर

sakal_logo
By

९२ पालिकांतील ‘ओबीसीं’ना हुरहूर
आरक्षण सोडतीत समावेश नाही; स्वतंत्र कार्यक्रमाच्या आशेवर इच्छूक
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २५ : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
परंतु, आयोगाने राज्यातील ११५ नगरपरिषदा व ९ नगरपंचायतींचाच ओबीसी आरक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणुका जाहीर होवून स्थगिती दिलेल्या
९२ नगरपरिषदा व ४ नगरपंचायतींसाठीचा कार्यक्रम दिलेला नाही. हा कार्यक्रम तूर्त निर्गमित करता येणार नाही, असे आदेशात म्हटल्याने ओबीसीत संभ्रम आहे. तशी हुरहूरही त्यांना लागली आहे.
आयोगाने राज्यातील १७ जिल्ह्यातील ९२ नगरपरिषद आणि ४ नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम ८ जुलै रोजी जाहीर केला. यात जिल्ह्यातील गडहिंग्लज, कागल, कुरुंदवाड, वडगाव, मुरगुड, जयसिंगपूर पालिकांचा समावेश आहे. ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे या निवडणुका १४ ऑगस्ट रोजी स्थगित केल्या. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने २० जुलै रोजी ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचे आदेश दिले. न्यायालयीन आदेशानंतर दुसऱ्याच दिवशी ओबीसी आरक्षणाचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला. परंतु त्यात निवडणुका जाहीर न झालेल्या ११५ नगरपरिषद व ९ नगरपंचायतींचाच समावेश आहे. यात जिल्ह्यातील मलकापूर व पन्हाळा नगरपालिकांचा समावेश आहे. या सर्व पालिकांचेही पूर्वी ओबीसीशिवाय आरक्षण सोडत पूर्ण झाले असले तरी आता त्यातील सर्वसाधारण महिलांचे आरक्षण रद्द करुन नव्याने ओबीसी महिला-पुरुष, सर्वसाधारण महिलांचे आरक्षण काढण्याच्या सूचना आहेत. परंतु या कार्यक्रमात निवडणुका जाहीर करुन स्थगिती दिलेल्या ९२ नगरपरिषद व ४ नगरपंचायतींचा समावेश नाही. तेंव्हापासून संबंधित पालिका यंत्रणाही बुचकळ्यात पडली आहे.
ज्या दिवशी आरक्षण कार्यक्रमाचा आदेश आला, तेव्हा संबंधित ९२ पालिका अधिकाऱ्यांनाही वरिष्ठांकडून मार्गदर्शन घ्यावे लागले. निवडणुकांना स्थगिती दिलेल्या नगरपालिका व नगरपंचायतींसाठीचा कार्यक्रम तूर्तास तरी निर्गमित करता येणार नाही, असे आदेशात स्पष्ट म्हटल्याने त्याचा स्वतंत्र कार्यक्रम लागण्याची शक्यताही आहे. परंतु, चार दिवस उलटले तरी याबाबत कोणत्याच सूचना नाहीत. दोन आठवड्यात निवडणुका घेण्याचे सर्वोच्च आदेश असल्याने या निवडणुकांचा कार्यक्रम ओबीसीशिवाय की ओबीसीसह घेणार, हा पेच अद्याप सुटलेला नाही. यामुळे संबंधित नगरपरिषद व नगरपंचायती अंतर्गत असलेले ओबीसी इच्छुक संभ्रमात आहेत. या संस्थांच्या आरक्षणाची तयारीही प्रशासनाने केली असून आयोगाच्या मार्गदर्शनाने त्यांच्याकडे ओबीसी परिशिष्टही तयार आहे. परंतु जिल्हाधिकारी त्यांचे परिशिष्ट स्वीकारत नसल्याचेही सांगण्यात येते.

चौकट.
आरक्षण नसलेल्या जिल्हावर पालिका (कंसात नगरपंचायती)
*जळगाव ९, *पुणे ९ (२), * सोलापूर ११ (१), *जालना ४, *बीड ६, * नाशिक ७, *अहमदनगर ९ (१), *सातारा ५, *सांगली ५, *कोल्हापूर ६, *औरंगाबाद ४, *लातूर ३, *अमरावती २, *बुलढाणा १, *उस्मानाबाद ८, *धुळे २, *नंदूरबार १.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80617 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top