राज्य उत्पादन शुल्क कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य उत्पादन शुल्क कारवाई
राज्य उत्पादन शुल्क कारवाई

राज्य उत्पादन शुल्क कारवाई

sakal_logo
By

38473

औषधाच्या नावाखाली
कंटेनरमधून मद्याची वाहतूक

३४ लाखांचा साठा जप्त; चालकावर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २५ ः औषधाच्या नावाखाली कंटेनरमधून मद्याची वाहतूक करणाऱ्या चालकाला राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले. अनिल भाऊसाहेब कदम (वय २३, जालना रोड, बीड) असे त्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे ३४ लाखांचा मद्यसाठा जप्त केला. ही कारवाई उचगाव महामार्गावर केल्याचे निरीक्षक संभाजी बरगे यांनी सांगितले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने सांगितले की, हातकणंगले विभागाला काल बेकायदेशीर गोवा बनावटीच्या मद्याची एका कंटेनरमधून होणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी उचगाव येथील राष्ट्रीय महामार्गावर सापळा लावला. गांधीनगर फाट्याजवळ एक कंटेनर शिरोलीच्या दिशेने जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्यांनी तो कंटेनर थांबवला. चालक संशयित अनिल कदम याला कंटेनरमध्ये काय आहे?, याची विचारणा केली. त्यावेळी त्याने आत औषधे असल्याचे सांगितले. त्याची बिले आणि कागदपत्रेही दाखवली. त्याची पडताळणी केल्यावर पथकाचा संशय बळावला. त्यांनी कंटेनरच्या शटरचे सील तोडून तपासणी केली. त्यात गोवा बनावटीचे मद्याचे ५५० बॉक्स मिळून आले. त्याची किमंत ३४ लाखा असून कंटेनरसह एकूण ४४ लाख ८५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे बरगे यांनी सांगितले. ही कारवाई अधीक्षक रवींद्र आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक राजाराम खोत, हातकणंगलेचे निरीक्षक संभाजी बरगे, कागलचे निरीक्षक जगन्नाथ पाटील, दुय्यम निरीक्षक बबन पाटील, शीतल शिंदे, सहायक दुय्यम निरीक्षक आनंदा वाघमारे, कर्मचारी सचिन लोंढे, सागर शिंदे, अनिल दांगट, बालाजी गिड्डे, चालक राहुल संकपाळ, योगेश शेलार यांनी केली.

चौकट ः
ंटोळी असल्याचा संशय...
संबंधित कंटेनर आणि त्यामधील मुद्देमाल हा बीडमधील बाळू कुटे याचा असल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार त्याच्यावरही गुन्हा दाखल केला असल्याचे निरीक्षक बरगे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80620 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top