घर तेथे परसबाग कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घर तेथे परसबाग कार्यशाळा
घर तेथे परसबाग कार्यशाळा

घर तेथे परसबाग कार्यशाळा

sakal_logo
By

38516

येळवण जुगाईत घर तेथे परसबाग कार्यशाळा
निसर्गमित्र परिवाराचा उपक्रम; दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

कोल्हापूर, ता. २५ ः येथील निसर्गमित्र परिवारातर्फे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व वनसंवर्धन दिनानिमित्त जुगाई हायस्कूल व ज्युनियर कॉलेज (येळवण जुगाई) येथे ‘सहज तयार करूया-घर तेथे परसबाग व पर्जन्यमापक उपकरण'' कार्यशाळा नुकतीच झाली. पशुवैद्यकीय चिकित्सक डॉ. विजय मगरे, पराग केमकर व अनिल चौगुले यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक पी. एस. कुंभार होते.
अनिल चौगुले यांनी सुरक्षित अन्न, शारीरिक व मानसिक आरोग्य, रोग प्रतिकारशक्ती या अनुषंगाने परसबागेचे महत्त्‍व सांगितले. पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवून आलेल्या रोपांचे संकलन करून त्यांचे संवर्धन करण्याबरोबरच प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या घराभोवती परसबाग तयार करून रोजच्या वापरातील तसेच विविध औषधी वनस्पतींची जोपासना करावी, असे आवाहन त्यांनी केले. केमकर यांनी गाव परिसरात पडणारा पाऊस मोजण्यासाठी टाकाऊ वस्तूंपासून पर्जन्यमापक कसे तयार करावे, याचे प्रात्यक्षिक दाखवले. डॉ. मगरे यांनी मानव आणि पाळीव प्राणी यांच्या सहजीवनाचे महत्त्‍व सांगून पाळीव प्राण्यांची निगा कशी राखावी याविषयी मार्गदर्शन केले. पाळीव प्राणी आजारी पडल्यास, आजाराचे प्राथमिक निदान व आयुर्वेदिक उपचारपद्धती वापरून प्रथमोपचार कसे करावे हे विद्यार्थ्यांना सोप्या शब्दात समजावून सांगितले.
दुसऱ्या सत्रात शाळेच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून औषधी वनस्पतींची वृक्षपेढी तयार करण्यात आली. यात रक्तचंदन, जारूळ, रिठा, शेंद्री, पळस, भोकर, तिरफळ, इत्यादी विविध प्रकारच्या ३० औषधी वनस्पतींची लागवड करून ही रोपे विद्यार्थी गटांना दत्तक दिली. या वेळी संजय पाटील यांनी रोपांबरोबरच शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकेही भेट दिली. दोनशेहून अधिक विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80639 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top