गोकुळ महाराष्ट्रातील आदर्शवत संघ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोकुळ महाराष्ट्रातील आदर्शवत संघ
गोकुळ महाराष्ट्रातील आदर्शवत संघ

गोकुळ महाराष्ट्रातील आदर्शवत संघ

sakal_logo
By

38484

‘गोकुळ’ राज्यात आदर्शवत संघ
लेखा समितीचे अध्यक्ष क्षीरसागर यांची भेट

कोल्‍हापूर, ता. २५ ः गोकुळ हा महाराष्ट्रातील आदर्शवत सहकारी दूध संघ आहे. गोकुळने गुणवत्तेचा जोरावर पुणे, मुंबई तसेच राज्यातील इतर शहरात व्यवसाय वृद्धिंगत केला आहे. महाराष्ट्रातील इतर सहकारी संस्थांनी गोकुळच्‍या कामकाजाचा आदर्श घेतला पाहिजे, असे मत राज्‍यस्‍तरीय लेखा समितीचे अध्‍यक्ष शहाजी क्षीरसागर यांनी व्यक्त केले. पुणे येथील राज्यस्तरीय लेखा समिती (महाराष्ट्र शासन)चे अध्यक्ष श्री. क्षीरसागर यांनी ‘गोकुळ’ संघास भेट दिली. यावेळी गोकुळचे अध्‍यक्ष विश्वास पाटील यांच्‍या हस्‍ते व कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्या हस्ते सत्‍कार झाला. श्री. पाटील म्‍हणाले, दूध उत्पादक शेतकरी व ग्राहक यांना केंद्रबिंदू मानून संघाचे कामकाज चालते. संघाबद्दल असणारी दूध उत्पादक शेतकऱ्यांची आस्था हीच गोकुळच्या प्रगतीचे मुख्य कारण आहे.
यावेळी राहुल देवकर, जुबिन शिकलगार, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, व्‍यवस्‍थापक प्रशासन डी. के. पाटील, व्‍यवस्‍थापक वित्त हिमांशू कापडिया, सहायक व्‍यवस्‍थापक प्रशासन रामकृष्ण पाटील उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80659 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..