माणगांवला घरटी रोपांचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माणगांवला घरटी रोपांचे वाटप
माणगांवला घरटी रोपांचे वाटप

माणगांवला घरटी रोपांचे वाटप

sakal_logo
By

38495
माणगाव : येथे तंटामुक्त समितीतर्फे ग्रामस्थांना कडुलिंबाच्या रोपांचे वितरण करताना जयवंत सुरुतकर, शिवाजी पाटील व इतर.


माणगावला घरटी रोपांचे वाटप
तंटामुक्त समितीचा पुढाकार; ३५० कडुलिंबांचे होणार रोपण
सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. २५ : पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज असल्याने त्यादृष्टीने स्वतःपासून त्याची सुरुवात करता यावी म्हणून माणगाव (ता. चंदगड) येथील तंटामुक्त समितीने ग्रामस्थांना मोफत कडुलिंबाची रोपे वाटप केली. घरटी एक रोप याप्रमाणे ३५० रोपांचे गावात वाटप झाले आहे. ग्रामस्थांनी ही रोपे आपल्या घरासमोर किंवा परसात लावावीत, अशा सूचना सरपंच अश्‍विनी कांबळे व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जयवंत सुरुतकर यांनी दिल्या आहेत.
शासनस्तरावर दरवर्षी वृक्षलागवड योजनेंतर्गत प्रयत्न केले जातात; पण सर्वच ठिकाणी त्याला यश येते असे नाही. अनेक ठिकाणी खड्डे तेच, रोपे नवी अशी स्थिती असते. याचा अभ्यास करुन माणगांव तंटामुक्त समितीने आपल्या स्तरावर वृक्षलागवडीचा नवा प्रयोग राबविला आहे. तंटामुक्त समितीत जमा झालेली दंडाची रक्कम यासाठी वापरली आहे. ग्रामस्थांनी याला प्रतिसाद दिल्याने वृक्षलागवडीला गती मिळाली आहे. ग्रामपंचायत कार्यालयात रोपांच्या वितरणाचा कार्यक्रम झाला. या वेळी उपसरपंच बाबू दुकळे, माजी पंचायत समिती सदस्य अनिल सुरुतकर, अनिल फडके, शिवाजी पाटील, जयवंत कांबळे, जे. के. कुंभार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80682 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..