सर्कीट बेंच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्कीट बेंच
सर्कीट बेंच

सर्कीट बेंच

sakal_logo
By

38527

मुख्य न्यायमूर्तींची लवकरच भेट घेणार

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस ; सर्कीट बेंच प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ ः मुंबई उच्च न्यायालयाचे सर्कीट बेंच कोल्हापुरात व्हावे, हा सहा जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न आले, हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच मुख्य न्यायामूर्तींची भेट घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. खंडपीठ कृती समितीने विमानतळावर आज त्यांची भेट घेऊन यासंबधीचे निवेदन दिले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यांची खंडपीठ कृती समितीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकाराने विमानतळावर भेट घेतली. शिष्टमंडळाने सर्कीट बेंच स्थापनेबाबत निवेदन दिले. यावेळी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. विवेक घाटगे यांनी कोल्हापूर सर्किट बेंचचा प्रश्न अंतिम टप्यात आलेला आहे. केवळ मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे मुख्य न्यायमूर्ती यांनी कळविले आहे. यासंबधी प्राप्त झालेल्या पत्रातील मजकूर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिला. खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके यांनी सदरचा सर्किट बेंचचा प्रश्न सहा जिल्ह्यातील सर्व सामान्य पक्षकाराशी निगडित आहे. त्यामध्ये सातारा हा आपल्याही जिल्हाचा समावेश असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी हा प्रश्न अग्रक्रमाने सोडवू असे आश्वासन दिले.
राजेश क्षीरसागर यांनी या प्रश्नी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री शिंदे यांची बैठक लावणार असल्याचे सांगितले.
शिष्टमंडळात बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी अध्यक्ष ॲड. महादेवराव आडगुळे, सचिव अॅड. विजय ताटे-देशमुख, माजी अध्यक्ष अॅड प्रशांत चिटणीस, अॅड प्रकाश मोरे आदींचा समावेश होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80697 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top