कृषि तंत्र पदविका प्रवेशाला मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषि तंत्र पदविका प्रवेशाला मुदतवाढ
कृषि तंत्र पदविका प्रवेशाला मुदतवाढ

कृषि तंत्र पदविका प्रवेशाला मुदतवाढ

sakal_logo
By

38519
हेल्पर्स संस्थेच्या
सहसचिवपदी प्रज्ञा मगर
कोल्हापूर ः येथील हेल्पर्स ऑफ हॅन्डीकॅप्ड संस्थेच्या नूतन सहसचिवपदी प्रज्ञा पांडूरंग मगर यांची निवड झाली. काही दिवसांपूर्वी संस्था सहसचिव रमेश रांजणे यांचे निधन झाले. त्यांच्या रिक्त जागेवर संस्थेने ही निवड केली. प्रज्ञा संस्थेच्या माजी विद्यार्थिनी असून संस्थेच्या कार्यकर्ती म्हणूनही त्या कार्यरत आहेत. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण हेल्पर्सच्या उंचगाव (पूर्व) येथील घरोंदा वसतिगृहात राहून पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी एमबीए (एचआर) ही पदवी संपादन केली. सध्या त्या डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग (साळोखेनगर) येथे ऑफिस एक्झिक्युटिव्ह पदावर कार्यरत आहेत. संस्थेच्या ‘हम होंगे कामयाब’ या सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता. साठहून अधिक कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. वैयक्तिक आयुष्यात स्थिरावल्यावर त्यांनी पुन्हा संस्थेच्या कार्यात सहभागी होण्याचे ठरवले व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वप्ननगरी प्रकल्पासाठी योगदान देण्यास सुरुवात केली. संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या नीता देशभ्रतार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला.


कृषि तंत्र पदविका प्रवेशाला मूदतवाढ
कोल्हापूर ः महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी तर्फे २०२२ - २३ या शैक्षणिक वर्षासाठी कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला २९ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. दहावीनंतर दोन वर्षे मुदतीच्या मराठी माध्यमातील अभ्यासक्रम आहे. जिल्ह्यातील शाहू कृषि तंत्र विद्यालय (लाईन बझार, कसबा बावडा), तळसंदे (ता. हातकणंगले), कागल, दत्तवाड (ता. शिरोळ), परिते (ता. करवीर), कणेरी मठ (ता. करवीर) व कसबा तारळे (ता. राधानगरी) येथे हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. तीन वर्षे मुदतीचा, सहा सत्रांचा इंग्रजी माध्यमांचा कृषि तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम मौनी विद्यापीठाचे कृषि तंत्र निकेतन गारगोटी यासह इतर १३ ठिकाणी विनाअनुदानित तत्वावर अभ्यासक्रम सुरू आहे. त्याचीही प्रवेश प्रक्रीया २९ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. माहितीपुस्तिका व प्रवेश अर्ज http://mpkvdiplomaadmission.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. प्रवेश अर्ज दाखल करताना उमेदवाराने आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन जमा करावीत, असे आवाहन प्राचार्य डॉ. किरण गुरव यांनी केले आहे.

बार्टीच्या प्रशिक्षणात ७० तरूणांचा सहभाग
कोल्हापूर ः बार्टीतर्फे एमसीईडी आयोजित एकदिवसीय हाय टेक उद्योजकता विकास परिचय प्रशिक्षण कार्यक्रम झाला. सामाजिक न्याय भवनमध्ये झालेल्या प्रशिक्षणात ७० युवक - युवतींनी सहभाग घेतला. एमएसईडीच्या प्रकल्प अधिकारी वनिता पाटील यांनी हायटेक ईडीपी प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत माहिती दिली व उपस्थित युवकांच्या शंकांचे निरसरन केले. यावेळी जात पडताळणी समितीचे उपायुक्त सदस्य उमेश घुले, जिल्हा उद्योजकता विकास व कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त माळी, समाजकल्याण कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक सचिन पाटील, बार्टीचे प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे, माजी प्राचार्य सोनवणे, सुनंदा मेटकर, किरण चौगुले, पूजा धोत्रे, प्रतिभा सावंत उपस्थित होते.आशा रावण यांनी सूत्रसंचालन केले. प्रतिभा सावंत यांनी आभार मानले.

दारिद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांना आवाहन
कोल्हापूर ः दारिद्रयरेषेखालील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेता यावे, यासाठी सरोजिनी दामोदरन फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्र शिष्यवृत्ती कार्यक्रम २०२२ अंतर्गत अकरावीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यासाठी फाऊंडेशनने राज्यभरातील दोन लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या दारिद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे. दहावीत ८५ टक्के हून अधिक गुण आणि प्रत्येक विषयात ए प्लस श्रेणी (७५ टक्के अपंग विद्यार्थ्यांना) असेल असे विद्यार्थी या शिष्यवृतीसाठी पात्र ठरणार आहेत. महाराष्ट्रात शिकत असले विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र राहणार आहेत. निवडक विद्यार्थ्यांना ११वी आणि १२ वीसाठी शिष्यवृत्ती १० हजार प्रत्येक वर्षी दिले जातात. जर त्यांची प्रगती दरवर्षी उत्तम राहिली तर त्यांच्या आवडीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी दहा हजार ते साठ हजार रूपये प्रतिवर्षी दिले जातात. अधिक माहितीसाठी www.vidyadhan.org ह्या संकेतस्थळाला भेट देऊन ३१ पर्यंत अर्ज करावेत.

किणी नाक्यावर आज मनसेचे आंदोलन
पेठवडगाव : किणी टोल वसुली मुदत संपलेली असतानाही टोल वसुली सुरु असल्याच्या निषेधार्थ व टोल वसुली बंद करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेनेतर्फे मंगळवारी (ता.२६) टोल बंद आंदोलन करणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष राजू जाधव यांनी दिली. किणी नाक्याची टोल वसुली मुदत संपलेली होती. त्यावसुलीसाठी महिन्याची मुदतवाढ दिली. परंतु त्यानंतर ती बंद झाली नाही. वसुली सुरु आहे. रस्ते तयार करायचे व त्याचे २५ पट पैशांची वसुली करायची असे धोरण सुरु आहे. अन्यायकारक वसुलीच्या निषेधार्थ मनसेच्यावतीने अभिनव पध्दतीने आंदोलन करण्याचा इशारा पत्रकातून दिला आहे.

पासपोर्ट विभागातील सर्व्हर डाऊन
कोल्हापूर ः पासपोर्ट (पारपत्र) विभागाचा सर्व्हर डाऊन झाल्याने पासपोर्ट काढण्यासाठी आलेल्या उमेदवारांची काही तास गैरसोय झाली.
पासपोर्ट काढण्याची सुविधा आता शहरातच उपलब्ध झाली आहे. या विभागाचे कार्यालय मणेरमळा येथे आहे. विभागाचा आज सकाळी अचानक सर्व्हर डाऊन झाला. त्यामुळे पासपोर्ट संबधीचे काम ठप्प झाले. पासपोर्ट काढण्यासाठी जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या उमेदवारांना कार्यालयात बसून सर्व्हर सुरू होण्याची प्रतिक्षा करावी लागली. हा सर्व्हर दुपारी पावणे तीनच्या सुमारास सुरू झाला. या विभागाचे कामकाज सुरू झाल्याचे येथील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80705 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..