
अतिक्रमण कारवाई
१०४७ विक्रेत्यांवर
१७ महिन्यांत कारवाई
कोल्हापूर, ता. २५ : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत १ जानेवारी २१ ते ३० जून २०२२ अखेर शहरातील १०४७ विक्रेत्यांवर व १२००१ अनधिकृत होर्डिंग, डिजिटल बोर्ड व स्टॅंड बोर्डवर कारवाई केली. पाच जणांवर गुन्हेही नोंद केले आहेत.
१०४७ जणांवरील कारवाईत सात बेवारस वाहने, १०६ हातगाड्या, २७ केबिन, ९०७ वजन काटे व स्टॉलवरील छत्री यांचा समावेश आहे. संबंधितांकडून २ लाख ५९ हजार ६०० रुपये दंड वसूल केला. तसेच अनाधिकृत ३५४ डिजिटल बोर्ड, १०८९० बॅनर, झेंडे व ७५७ स्टँड बोर्डवर कारवाई करून १२,००१ जणांकडून ७१ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला. एक डंपर व अतिक्रमण निर्मूलनच्या ३० कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने कारवाई केली. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, कनिष्ठ लिपिक सज्जन नागलोत, मुकादम राजू माने, शरद कांबळे, रवींद्र कांबळे यांनी कारवाई केली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80732 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..