
डेंगी तपासणी
१४७ घरांमध्ये डासअळ्या
शहरात तापाचे रुग्ण; महापालिकेकडून सर्वेक्षण सुरू
कोल्हापूर, ता. २५ : शहरात तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याने खबरदारी म्हणून महापालिकेने चालवलेल्या सर्वेक्षणात शहरातील १८८६ घरांच्या तपासणीत १४७ घरांत डासअळ्या सापडल्या. हे सर्वेक्षण महालक्ष्मीनगर, सदर बाजार, राजारामपुरी सातवी ते अकरावी गल्ली, शाहू कॉलनी, दगडी चाळ, कसबा बावडा, स्वराज्य कॉलनी, महालक्ष्मी कॉलनी, शिवशक्ती कॉलनी, प्रिन्स शिवाजीनगर, चंद्राई कॉलनी, फुलेवाडी पहिला व सहावा बस स्टॉप, शाहू चौक, दौलतनगर, वेताळ माळ तालीम परिसर, कनाननगर या ठिकाणी कीटकनाशक विभागाच्या पथकामार्फत करण्यात आले.
यात ३५४९ कंटेनरच्या तपासणीपैकी ४५ कंटेनर दूषित आढळले. ४२ कंटेनरमध्ये टेमिफॉसचे द्रावण टाकण्यात आले. कीटकनाशक विभागाकडून दैनंदिन औषध फवारणी, धूर फवारणी व डास अळी कंटेनर सर्वेक्षण करण्यात येत आहे.
भरून ठेवलेले पाण्याचे कंटेनर व भांडी आठवड्यातून एकवेळा कोरडी करून स्वच्छ ठेवावीत. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. नारळाच्या करवंट्या, वापरात नसलेले डबे, टायर यांची विल्हेवाट लावावी. झाडांच्या कुंड्या, फ्रिज मागील ट्रेमध्ये पाणी साचू देऊ नये. तापाच्या रुग्णांनी सरकारी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा. रक्तनमुने घेण्यासाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80734 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..