नैसर्गिक शेती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नैसर्गिक शेती
नैसर्गिक शेती

नैसर्गिक शेती

sakal_logo
By

38538

कोल्हापूर : प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत नैसर्गिक शेती जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. )

शाश्वत विकासासाठी नैसर्गिक शेतीची गरज
काडसिध्देश्वर स्‍वामी ; नैसर्गिक शेती जाणीव जागृती कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. २५: रासायनिक शेतीचे अनेक दुष्‍परिणाम दिसू लागले आहेत. माणसाच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. त्यामुळेच विषमुक्त व शाश्वत विकासासाठी नैसर्गिक शेती करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन अदृश्य काडसिध्देश्वर स्‍वामी यांनी केले. प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था अर्थात रामेती येथे झालेल्या नैसर्गिक शेती जाणीव जागृती कार्यक्रमात ते बोलत होते.
कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय कृषि विस्तार व्यवस्थापन संस्थान, वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, (वनमती) नागपूर व प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती), कसबा बावडा यांच्यातर्फे सरपंचांसाठी नैसर्गिक शेती जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
काडसिध्‍देश्‍‍वर स्‍वामी म्‍हणाले, एकूण जागतिक अन्नधान्य उत्पादनाच्या ९५ टक्के उत्पादन मातीतून होत असल्याने, मातीची सुपिकता टिकवून ठेवणे आवश्यक आहे. जमिनीतील उपयुक्त जिवाणू जिवंत राहिले तरच सजीवसृष्टी व मानवजात जिवंत राहणार असून, सर्व घटकांनी यासाठी सामुहीक प्रयत्न आवश्यक आहे. दैनंदीन जीवनात सकस व विषमूक्त अन्नाची गरज नमूद करुन, नैसर्गिक शेतीचे महत्व अधोरेखित करताना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सेंद्रीय भाजीपाला उत्पादनाकरीता विशेष कार्यक्रम मंजूर केल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्‍हाण यांनी सांगितले.

विभागीय कृषि सह संचालक बसवराज बिराजदार यांनी प्रत्यक्ष व ऑनलाईन पध्दतीने उपस्थित असलेल्या संरपचांनी कार्यक्षेत्रात नैसर्गिक शेती पध्दतीस सामुहीक पध्दतीने चालना देण्याचे आवाहन केले. तर नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून जमिनीची सुपिकता व कार्बन क्रेडिट याचे महत्व विषद करुन कोल्हापूर जिल्ह्याने सेंद्रीय उत्पादनात नाविण्यपूर्ण ओळख निर्माण करावी, असे आवाहन रामेतीचे प्राचार्य उमेश पाटील यांनी केले.
कार्यक्रमास १० उपविभागातील सरपंच व कृषी विभागाचे अधिकारी उपस्‍थित होते. नामदेव परीट यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80743 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..