पशुपालकांसाठी जाचक अटींची योजना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पशुपालकांसाठी जाचक अटींची योजना
पशुपालकांसाठी जाचक अटींची योजना

पशुपालकांसाठी जाचक अटींची योजना

sakal_logo
By

१ हेक्‍टर जमिनीची अट जाचक
अनुसूचित जाती प्रवर्गातील पशुपालकांसाठी शेवगा लावगड अनुदान योजना

सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ : राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील पशुपालकांनी वैरणीसाठी शेवगा लावगड करावी यासाठी त्यांना २३ हजार २५० रुपये अनुदान दिले जाणार आहे; मात्र त्यांच्याकडे स्वमालकीची किमान १ हेक्‍टर म्हणजेच अडीच एकर जमीन असणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात अल्पभूधारकांची संख्या जास्त आहे. यातच अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांकडे पाच ते दहा गुंठ्यांच्यावरती शेती नाही. त्यामुळे १ हेक्‍टरची अट घातल्यामुळे या योजनेला फारसा प्रतिसाद मिळेल असे सध्या तरी दिसत नाही.
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत वैरणीसाठी शेवगा लागवड करण्यासाठी पात्र शेतकऱ्यांचे अर्ज मागविले आहेत. कोल्हापूरमध्ये तब्बल ८ ते १० लाख खातेदार शेतकऱ्यांपैकी ६ लाख शेतकरी अल्पभूधारक आहेत. ज्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांची सर्वाधिक संख्या आहे. पशुसंवर्धनकडून जाहीर झालेली योजना निश्‍चितपणे चांगली आहे. पशुपालकांना याचा लाभही होणार आहे; मात्र यातील मुख्य अटच शेतकऱ्यांना या योजनेपासून परावृत्त करणारी आहे. त्यामुळे यातील नियम, अटी शिथिल कराव्या लागणार आहेत. तसेच ज्यांना लाभ देणार आहेत, त्यांपैकी केवळ १५ च लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. यामध्येही हाताच्या बोटावरती मोजण्याएवढे मोठे लाभार्थी याचा फायदा घेतील, तर गरजू आणि सर्वसामान्य अनुसूचितमधील लाभार्थ्यांना या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे, हे यातून स्पष्ट होत आहे. योजना राबवत असताना त्याचा तळागाळातील आणि सर्वसामान्य पशुपालकांना किती लाभ होईल, याचा विचार होणे गरजेचे आहे. ज्यांच्याकडे १ हेक्‍टर जमीन आहे, अशा अनुसूचित जाती प्रवर्गातील पशुपालकांना २३ हजार २५० रुपयांचे अनुदान मिळेल. ते बॅंक खात्यात जमा केले जाईल.

चौकट
असे मिळेल अनुदान
अनुदानाचा पहिला हप्ता बियाण्यांची लागवड केल्यानंतर, तर दुसरा हप्ता एका वर्षानंतर दिला जाणार आहे. तसेच १ हेक्‍टर जमिनीसाठी ६ हजार ७५० रुपयांचे बियाणे दिले जाणार आहे. तसेच सेंद्रिय खत, रासायनिक खत, कीटकनाशकांसाठी ५२५० रुपये, मशागत खर्च १२ हजार रुपये व विद्युत, इंधन खर्च, वाहतूक खर्चासाठी ६ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.

कोट
राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत १ हेक्‍टर जमीन असणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील पशुपालकांना शेवगा वैरणीसाठी अनुदान दिले जाणार आहे. यासाठी मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्राच्या आवारात असणाऱ्या जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाकडे ३० जुलैपर्यंत अर्ज करावेत. आलेल्या अर्जांपैकी १५ लाभार्थ्यांना हा लाभ दिला जाणार आहे.
-डॉ. वाय. ए. पठाण,
उपआयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन, कोल्हापूर.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80744 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..