
जिल्हा परिषदेतील गर्दी ओसरली
जिल्हा परिषदेतील
गर्दी ओसरली
कोल्हापूर : राज्यात झालेला सत्ता बदल, जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीला ब्रेक, विविध विकासकामे तसेच निविदा प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिल्याने जिल्हा परिषदेत मात्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. महिन्यापूर्वी जिल्हा परिषदेत निधी मिळवण्यासाठी व विकासकामे मार्गी लावण्यासाठी माजी सदस्यांसह कंत्राटदारांची लगबग सुरु होती. मात्र राज्यात अचानक सत्ता बदल झाला. सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झालेल्या निधी वितरणाचे आदेश स्थगिती व रद्द केले आहेत. त्यामुळे विकासकामांसाठी, निविदेसाठी जिल्हा परिषदेत होणारी गर्दी अचानक थांबली आहे. नवीन सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, पालकमंत्र्यांची नेमणूक व जिल्ह्यातील काही आमदारांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतरच जिल्हा परिषदेत गर्दी होण्यास सुरुवात होईल. यापूर्वी प्रशासकांना विकासकामे मंजुरीचे असणारे अधिकारही अप्रत्यक्षरित्या गोठवले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेतील खातेप्रमुखही सध्या निवांत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80773 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..