संघर्षातून फुलले चव्हाणांचे नेतृत्व; आमदार पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संघर्षातून फुलले चव्हाणांचे नेतृत्व; आमदार पाटील
संघर्षातून फुलले चव्हाणांचे नेतृत्व; आमदार पाटील

संघर्षातून फुलले चव्हाणांचे नेतृत्व; आमदार पाटील

sakal_logo
By

38675
चन्नेकुप्पी : वाढदिवसानिमित्त अमर चव्हाण यांचा सत्कार करताना राजेश पाटील. शेजारी अरुंधती चव्हाण, रामाप्पा करिगार, उदय चव्हाण, जयसिंग चव्हाण, भिकू गावडे, बाबासो पाटील, अनिकेत कोणकेरी आदी.

संघर्षातून फुलले चव्हाणांचे नेतृत्व
आमदार पाटील; चन्नेकुप्पीत अमर चव्हाण यांचा झाला गौरव
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २६ : पंचायत समितीचे माजी सभापती अमर चव्हाण यांचे व्यक्तिमत्त्‍व निर्भीड आहे. सर्वसामान्यांवर होणाऱ्या अन्यायाप्रसंगी समोरच्यांना उघड्या छातीवर घेण्याची ताकद त्यांच्यात आहे. अशा कार्यामुळेच नेतृत्व घडत असते. विविध पातळीवर त्यांनी संघर्ष आणि कष्टाने स्वत:चे कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यातूनच त्यांचे नेतृत्व फुलले आहे, असे मत आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केले.
चन्नेकुप्पी (ता. गडहिंग्लज) येथे वाढदिवसानिमित्त सिद्धेश्‍वर मंदिरात आयोजित अमर चव्हाण यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी आमदार पाटील यांच्या हस्ते चव्हाण व अरुंधती चव्हाण यांचा गौरव करण्यात आला.
आमदार पाटील म्हणाले, ‘‘गोडसाखर सुरू होण्यासाठी चव्हाण यांची धडपड लक्षवेधी होती. त्यातून गोडसाखर सहकारातच राहण्यासाठीची त्यांची तळमळ दिसून आली. सहकाराचे हे मंदिर शेतकऱ्यांच्याच मालकीचे ठेवण्यासाठी सर्वतोपरी मदतीची माझी तयारी आहे. भविष्यात एका मोठ्या पदाने चव्हाणांचा सन्मान करण्याचा प्रयत्न करू.’’
चव्हाण म्हणाले, ‘‘गडहिंग्लजकर म्हणून गोडसाखर सहकारातच सुरू राहण्यासाठी प्रयत्न केले. यापुढेही आमची हीच भूमिका असेल. गोडसाखरने हजारो कुटुंबाचे दारिद्र्य संपविले आहे. या माध्यमातून तालुक्याचे सहकार आमदार पाटील निश्‍चित जीवंत ठेवतील. यामुळे त्यांच्या मागे खंबीरपणे राहणे तालुक्याच्या हिताचे ठरेल. यापुढेही मी जनतेचा हमाल म्हणूनच काम करत राहीन.’’
माजी सरपंच उदय चव्हाण यांनी स्वागत केले. जयसिंग चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले. रामाप्पा करिगार, जयकुमार मुन्नोळी, शिवप्रसाद तेली, गंगाधर व्हसकोटी, मनिषा तेली, दशरथ कुपेकर, गणपती पट्टणकुडी, अंकूश रणदिवे, राजेश पाटील-औरनाळकर, प्रकाश पाटील, रघुनाथ पाटील, बाळासाहेब मोर्ती, राजलक्ष्मी चव्हाण यांची भाषणे झाली. भिकू गावडे, बाबासाहेब पाटील, अभयसिंह देसाई, संतोष पाटील, लक्ष्मण तोडकर, महाबळेश्‍वर चौगुले, दीपा चव्हाण, बाबूराव चौगुले, बाबूराव माने, अनिकेत कोणकेरी, सरपंच सुनीता पाटील, उपसरपंच वैशाली जाधव उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80942 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..