स्थलांतरीतांना जातीचे दाखले द्या; ‘वंचित’ची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्थलांतरीतांना जातीचे दाखले द्या; ‘वंचित’ची मागणी
स्थलांतरीतांना जातीचे दाखले द्या; ‘वंचित’ची मागणी

स्थलांतरीतांना जातीचे दाखले द्या; ‘वंचित’ची मागणी

sakal_logo
By

38690
गडहिंग्लज : वंचित बहुजन आघाडीतर्फे बाबासाहेब वाघमोडे यांना निवेदन देताना दीपक कांबळे, सुनील कांबळे, संतोष सुळकुडे.

स्थलांतरितांना जातीचे दाखले द्या
---
‘वंचित’ची मागणी; प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २६ : गडहिंग्लज व चंदगड तालुक्यात अनुसूचित जातीच्या कुटुंबांची संख्या मोठी आहे. या अनुसूचित जातीच्या स्थलांतरित कुटुंबातील मुलांना जातीचे दाखले दिले जात होते. पण, तांत्रिक बिघाडामुळे दाखले देणे बंद आहे. येत्या १५ दिवसांत तांत्रिक बिघाड दूर करावेत. अन्यथा सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे. प्रांताधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
अनुसूचित जातीच्या स्थलांतरित कुटुंबातील मुलांना दाखले वितरणात आलेल्या तांत्रिक बिघाडाबाबत यापूर्वी अनेकदा तक्रार करण्यात आली आहे. मात्र, आजपर्यंत त्यात दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे स्थलांतरितांचे दाखल्यांसाठीचे प्रस्ताव शाहू सुविधा केंद्र, महा ई सेवा केंद्रात स्वीकारले जात नाहीत. या प्रश्‍नाकडे लक्ष देऊन दाखले वितरणातील दोष १५ दिवसांत दुरुस्त करावा. अन्यथा सनदशीर मार्गाने आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी निवेदन स्वीकारले. ‘वंचित’चे जिल्हा महासचिव सुनील कांबळे, जिल्हा सहसचिव संतोष सुळकुडे, प्रवक्ते अ. मा. दुंडगेकर, अनिकेत कांबळे, लोकेश निडसोशी, प्रियदर्शन कांबळे, दीपक कांबळे, जयदीप कांबळे, बबन नाईक, रत्न केदारी, सौरभ कांबळे, सुरेश कांबळे, अशोक कांबळे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80962 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..