१ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१

sakal_logo
By

मत-मतांतरे
---------

नैसर्गिक संकटांनी शेतकरी हतबल
सध्या निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. यापूर्वी कोल्हापूर व सांगली परिसरात सर्वत्र जोमदार पाऊस झाला, महापूर आले. मात्र, सध्या पाऊस अधूनमधून होतोय. गेल्या काही वर्षांत बेभरवशाचा पाऊस, गारपीट, दुष्काळ (ओला व कोरडा) अशी विविध संकटे एकापाठोपाठ आली. त्यामुळे शेतकऱ्यांचे यात अतोनात नुकसान झाले. गोव्यात व कोकणात नारळ, पोफळी, केळी आदींच्या बागा नष्ट झाल्या. सध्या अवेळी होत असलेल्या पावसामुळे हाता-तोंडाशी आलेली पिके मातीमोल होत आहेत. पाण्यामुळे पिके कुजतात. पाऊस पडला किंवा कमी झाला तरी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येते. अतिपावसामुळे काही पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. उसाच्या कमतरतेमुळे साखर कारखाने वेळेवर सुरू होणेही अवघड होते. शेतकऱ्यांमध्ये नैराश्‍य येते अन काही जण आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात, हीसुद्धा चिंतनीय बाब आहे. बेभरवशाच्या शेतीमुळे काही शेतकऱ्यांनी जोडधंदे सुरू केले. विशेषतः ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय, पशुपालन, कुक्कुटपालन आदी. जनावरांना पुरेसा चारा मिळत नाही, पशुखाद्याचे दर वाढत आहेत. मानव वा सरकार नैसर्गिक आपत्ती टाळू शकत नाही. म्हणून यावर संबंधितांनी कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्‍यक आहे.
अरुण कोटगी-बेनाडीकर, कोल्हापूर

...तरच आपला देश महासत्ता होईल
भारताला महासत्ता होण्यासाठी सर्व त्या उपाययोजना केल्या पाहिजेत. आज लोकशाहीही मजबूत झाली पाहिजे. लोकांचा त्यावरील विश्‍वास दृढ व्हायला हवा. तळागाळातील गरीब लोकांचा सर्वंकष विकास झाला पाहिजे. एकदा का आपला देश महासत्ता झाला, की भावी पिढ्यांना चांगले दिवस येतील. फक्त त्या दृष्टिकोनातून काम करायला हवे. त्यासाठी सर्वंकष कृती आराखड्याची गरज आहे. भारत पारतंत्र्यात असताना इंग्रजांनी देशाचे अतोनात नुकसान केले. त्यामुळे जनता गरीब झाली. परंतु, आता स्वतंत्र भारतात सुधारणा करायला हव्यात. त्यासाठी ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे. जनतेनेही ठोस निर्णय घेणाऱ्या पक्षांच्या पाठीशी राहिले पाहिजे, तरच आपला जगात टिकाव लागेल. जागरूक राहून व सदसदविवेक बुद्धीने निर्णय घेण्याची आज देशाला गरज आहे, तरच आपला देश महासत्ता होईल व त्याचा फायदा सर्वांना होईल.
सुदर्शन झलगे, कुंभोज (जि. कोल्हापूर)

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81013 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..