स्मार्ट टेक्नॉलॉजी अन्‌ स्मार्ट केकस्‌ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्मार्ट टेक्नॉलॉजी अन्‌ स्मार्ट केकस्‌
स्मार्ट टेक्नॉलॉजी अन्‌ स्मार्ट केकस्‌

स्मार्ट टेक्नॉलॉजी अन्‌ स्मार्ट केकस्‌

sakal_logo
By

38734/ 38735

लोगो : केकमधील नवतंत्रज्ञान-भाग १


पारंपरिक ते व्हर्च्युअल तंत्रज्ञानापर्यंत
केकचा बदलता प्रवास; माणसांचा बनला अविभाज्य घटक

लीड
पूर्वी पारंपरिक पद्धतीने केकची निर्मिती होत असे. आज केकचा पॅटर्न बदलला, केकच्या निर्मितीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश झाला. केक गतीने तयार होऊ लागला. केकने पारंपरिक ते व्हर्च्युअल तंत्रज्ञानापर्यंतचा प्रवास सुरू केला. भविष्यात केकनिर्मितीत अनेक घटक येणार आहेत. मात्र, केक फक्त वाढदिवसापुरता मर्यादित न राहता, तो आयुष्याचा अविभाज्य घटक होत आहे. माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या केकचा प्रवास आणि केकमधील नवतंत्रज्ञानचा आजपासून घेतलेला वेध.
-अमोल सावंत

ऑल इन वन मेथड
‘वुई वुड लव्ह टू हेल्प’, हा केकचा परवलीचा शब्द झाला. ऑल इन वन मेथड ज्यांनी अंगीकारली, ते लोक केकनिर्मिती अन्‌ वितरणात यशस्वी झाले. चरबीविरहित केक घेण्यात लोकांचा कल आहे. केक खाल्ल्यानंतर चरबी, वजन वाढणार नाही, याची काळजी लोक घेतात. सर्व प्रकारचे केक तयार करण्याचा हा जलद अन्‌ सोपा मार्ग आहे. क्रिमिंग, रबिंग-इन, वितळण्याची पद्धत, विस्किंग, तापमान घटक, ओव्हन आदी घटक केकला घडवितात. मैदा, साखर, शॉर्टनिंग अन्‌ अंडी किंवा स्किम मिल्क, पाणी, मीठ आवश्यक घटक आहेत; तर बेकिंग पावडर, दूध, फळे, चवीचे पदार्थ हे पर्यायी घटक केकला चव देतात. आज केकमध्ये लेयर केक, कपकेक, स्नॅक केक, रौलेड्स, चीज केक्स असे अनेक व्हरायटीज दिसते. केकची श्रेणी मोठी आहे. कँडी, चॉकलेट मिठाई, कुकीज, कस्टर्ड, फ्रॉस्टिंग, आइसिंग्स, फ्रोझन डेझर्ट्स अशाप्रकारांनी केक सजविला जातो.

नवीन तंत्रज्ञान कोणते?
-व्हर्च्युअल तंत्रज्ञान
-मायक्रोवेव्ह, स्टीम ओव्हन आणि इन्फ्रारेड ग्रील
-बेंच स्क्रॅपर्स, ड्रम चाळणी, हीट गन आणि क्वेनेल स्पून
-थ्रीडी दर्जाचे एक्स रे
-क्सिंग तंत्रज्ञान-व्हॅक्युम कुलिंग चेंबर्स-डिजिटल आर्द्रता सेंसर्स
-वायर कट मशिन
-हायड्रो बॉंड तंत्रज्ञान
-प्रादेशिक सुगंधी द्रव्यांचा समावेश
-सीट केक आयसिंग लाईन
-रोबोटिक केक मशिन मेकिंग
...

पूर्वी वाढदिवस असला की, केक कापला जात असे. आज अगदी कार किंवा टु व्हीलर घेतली तरी लोक केक आणतात. सिलेब्रेट करतात. आम्ही केकविला ब्रँडच्या माध्यमातून प्युअर केक ग्राहकांना दिले. आज प्युअर व्हेज केक म्हणजे, केकविला हा ब्रँड सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचला आहे. अगदी उपवास असला तरीही तुम्ही हा केक खाऊ शकता.
- रावसाहेब वंदुरे, केकविला ब्रँडचे मालक
...

केक करणे सोपे;
वितरण अवघड
केकच्या निर्मितीत तांत्रिक घटक महत्त्वाचे आहेत. उत्पादन तंत्र, माहिती आणि संप्रेषण संसाधने, उत्पादने, लॉजिस्टिक, विपणन, ई-कॉमर्स तंत्रज्ञानाचा समावेश होतो. केकनिर्मिती करणे एकवेळ सोप्पे; पण केक ग्राहकांपर्यंत वितरित करणे महत्त्वाचे ठरते. बेकरी, कंपनी कशी चालविले जाते, तिची उत्पादने कशी विकली जातील, उत्पादनांचा ग्राहक-पुरवठादारांशी संवाद, प्रतिस्पर्धी कंपनीचा डाटा गोळा करणे हे घटक कारणीभूत असतात. आज कोल्हापूर शहरात केक शॉपी खूप आहेत; पण ज्यांनी नवीन तंत्रज्ञान स्वीकारले, तेच केकमध्ये यशस्वी झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81043 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..