
चित्रीच्या पाणीपातळीत यंदा कुर्मगतीने वाढ
38758
आजरा : चित्री प्रकल्पातील पाणीसाठा.
चित्रीच्या पाणीपातळीत
यंदा कुर्मगतीने वाढ
८९ टक्के साठा; ऑगस्टमध्ये भरण्याची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २६ : आजरा व गडहिंग्लज तालुक्याला वरदान ठरलेला चित्री प्रकल्प ८९ टक्के भरला आहे. सध्या चित्री प्रकल्पाची पाणी पातळी कुर्मगतीने वाढत आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे हा प्रकल्प भरण्यास अवधी लागत आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा प्रकल्प पूर्ण क्षमतेन भरेल असे सांगण्यात येते. पण तत्पूर्वी धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यास प्रकल्प चार-पाच दिवसात भरेल, असेही पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येते.
चित्री प्रकल्पाची १८८६ दस लक्ष घनफूट इतकी क्षमता आहे. सध्या प्रकल्पात १६६७ दसलक्ष घनफूट इतका साठा झाला आहे. पाणी पातळी ७१६.७० मीटर इतकी आहे. आठ दिवसांपूर्वी झालेल्या संततधार पावसामुळे या प्रकल्पात पाण्याची आवक मोठी होती. ४० ते ४५ दसलक्ष घनफुटाने पाणी येत होते. सध्या ते १५ दसलक्ष घनफुटाने आवक आहे. त्यामुळे सध्या १० सेंटिमीटरने पाणी पातळीत वाढ होत आहे. पूर्ण क्षमतेन पाणीपुरवठा होण्यासाठी दोन मीटर पाणी पातळी वाढणे होणे आवश्यक आहे. चित्री धरणक्षेत्रात १५०० मिमी पाऊस झाला आहे. गतवर्षी २९ जुलैला प्रकल्प भरला होता. यंदा प्रकल्प भरण्यास वेळ लागणार आहे. उचंगी प्रकल्पात ७० टक्के पाणीसाठा केला जाणार आहे. उचंगीचा पाणीसाठा ५५ टक्के झाला आहे. खानापूर प्रकल्पात ७० टक्के पाणीसाठा झाला आहे. चिकोत्रामध्ये ७९ टक्के पाणीसाठा झाला आहे. आंबेओहळ मध्यम प्रकल्प व धनगरबाडी, एरंडोळ लघु पाटबंधारे तलाव पूर्णक्षमतेन भरले आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81044 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..