पणन तर्फे कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पणन तर्फे कार्यशाळा
पणन तर्फे कार्यशाळा

पणन तर्फे कार्यशाळा

sakal_logo
By

मॅग्नेट प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान
डॉ. सुभाष घुले; शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर ,ता. २५ ः ‘‘ मॅग्नेट प्रकल्पामुळे राज्यातील फळे, भाजीपाला व फुलांच्या उत्पादनावर प्रक्रिया करण्यासह विपणन आणि निर्यातीला चालना मिळणार आहे. शेतकरी कंपन्यांच्या सहभागाने राबवण्यात येणारा हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत सहभागी होणाऱ्या संस्थांसाठी मॅचिंग ग्रँट घटकांतर्गत मार्गदर्शन कार्यशाळा झाली. यात राज्यातील जिल्ह्यातील फळे, भाजीपाला फुलांच्या निर्यातीबाबत शेतकरी कंपन्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहातही कार्यशाळा झाली.
डॉ. घुले म्हणाले, ‘‘ आशियाई विकास बँक व महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ यांच्यातर्फे राज्यात मॅग्नेट प्रकल्पाची अंमलबजावणी होत आहे. १ हजार ६७ कोटीचा हा प्रकल्प आहे. त्याचा सहा वर्षांचा कालावधी आहे. या प्रकल्पात कोल्हापूर विभागातील डाळींब, केळी, भेंडी, स्ट्रॉबेरी, हिरवी मिरची, लाल मिरची व फुल पिके या सात पिकांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यामध्ये कोल्हापूर विभागातील ५ शेतकरी उत्पादक कंपन्या, फळे व भाजीपाला सहकारी संस्थांची निवड झाली. खासगी गुंतवणुकदारांचाही प्रतिसाद चांगला आहे. त्यामुळे प्रकल्पाचा दुसरा टप्पाही लवकरच सुरू होईल.’’
या कार्यशाळेत सहा शेतकरी उत्पादक कंपन्या, तीन महिला गटाचे प्रतिनिधी उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी सात शेतकरी उत्पादक कंपन्या व तीन माविम अंतर्गत महिला गट यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कोल्हापूरचे सचिन कांबळे, मॅग्नेट प्रकल्पाचे सल्लागार सुयोग टकले, कृषि पणन मंडळाचे मुकुंद फळे, प्रतिक गोनुगडे व सहर्ष साळुंखे उपस्थित होते.
या कार्यशाळेत प्रितिश चौगुले यांनी व्यवसाय आराखडा बनवणे, सोहम सिन्हा यांनी मॅचिंग ग्रॅंट अंतर्गत पात्र व अपात्र घगटक तसेच पीक काढणी पश्चात सुविधांसाठी अर्थसहाय्य, सुरजित सिन्हा यांनी पिकांसाठी मूल्य साखळ्या विकसित करणे व व्यवसायातील संधी व अत्याधुनिक तंत्रज्ञान संदर्भात तर शरद पंत यांनी अन्नाची वितरण व्यवस्था कार्यक्षम करणे व शेतकरी उत्पादक संस्थांचा सहभाग वाढवणे याविषयी मार्गदर्शन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81050 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..