
काही पत्रके पत्रके
38757
रुक्मिणी माळी यांना पुरस्कार जाहीर
कोल्हापूर : वीरशैव लिंगायत माळी समाज जिल्हा संघटनेच्या वतीने देण्यात येणारा समाजातील आदर्श माता पुरस्कार यंदा रुक्मिणी माळी यांना जाहीर झाला. या पुरस्काराचे वितरण ३१ जुलैला भागिरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम शाहू स्मारक भवन येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. वीरशैव माळी समाजाच्या वतीने दरवर्षी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि आदर्श माता पुरस्कार समारंभ घेतला जातो. हुपरीच्या नगराध्यक्षा जयश्री गाट यांच्या हस्ते विद्यार्थी गौरव समारंभ होईल. कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समाजाचे अध्यक्ष अशोक माळी यांनी केले आहे.
...
दिनानाथ विद्यामंदिरमध्ये वृक्षारोपण
कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठान संचलित मास्टर दिनानाथ विद्यामंदिर शाळेत प्राथमिक शिक्षण मनपाचे प्रशासनाधिकारी डी. सी. कुंभार, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे यांच्या हस्ते शाळेच्या समोरील प्रांगणात वड, पाम ट्री लावून वृक्षारोपण केले. मुख्याध्यापक विश्वास केसरकर यांनी पाहुण्यांना कोल्हापुरी फेटा बांधून स्वागत केले. वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाबाबत माहिती दिली. ऐश्वर्या बन्ने, प्रिया पवार, संगीता पाटील, दिव्या गवळी, कविता राबाडे, वैशाली पाटील, पूर्वी रेवाळे, नाजमीन खातुन खान, सुषमा सामंत, तस्मिया नदाफ, संतोष निगवेकर, महिंद्र काकडे, किशोर वायदंडे, नारायण येटाळे उपस्थित होते. सुरेश चौगले यांनी आभार मानले.
...
‘तंत्रनिकेतन’च्या विद्यार्थ्यांची निवड
कोल्हापूर : भारती विद्यापीठ तंत्रनिकेतन पॉलिटेक्निक येथील विद्यार्थ्यांची टाटा ॲटोकॉम्प सिस्टिम्स पुणे कंपनीत निवड झाली. पूल कॅम्पस इंटरव्ह्यूमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या चार विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती प्राचार्य महेश देशमुख, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर सुरज जाधव यांनी दिली. विद्यार्थ्यांची नावे अशी : सुशांत मोरे, संग्राम मदने, अथर्व दुधाने आणि संकेत कांबळे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक एच्. एम्. कदम, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81055 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..