
कलाकारांना सानुग्रह अनुदानाचे वाटप
जिल्हा परिषदेतून...
कलाकारांना सानुग्रह
अनुदानाचे वाटप
--
२८० पात्र लाभार्थीं; कोराना काळातील मिळाली रक्कम
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २६ : कोरोनामुळे मागील दीड दोन वर्षे सांस्कृतीक कार्यक्रम थांबले होते. यामुळे कलाकारांची आर्थिक कुचंबणा होत होती. या कलाकारांना मदत करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले होते. यातून २८० पात्र लाभार्थींची निवड केली होती. त्यांना प्रत्येकी पाच हजारांचे अनुदान दिले. मात्र अनुदानाची रक्कम ज्या कलाकारांच्या खात्यावर जमा झालेली नाही, त्यांनी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने राज्यासह देशात लॉकडाउन लागू होता. लॉकडाउन शिथिल केल्यानंतरही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, नाट्यगृहे, चित्रपटगृहे यांच्यावर बंदी असल्याने कलाकारांना सुमारे दीड वर्षापर्यंत कला सादरीकरण व त्यातून होणारे उत्पन्न यापासून वंचित राहावे लागले होते.
अशा कलाकारांना आर्थिक साहाय्य म्हणून ५ हजार रुपयेप्रमाणे सानुग्रह अनुदान देण्यासाठी शासनाने कलाकारांच्या अर्जांची मागणी केली होती. या अर्जातून जिल्हास्तरीय एकल कलाकार निवड समितीने २८० पात्र एकल कलाकारांची निवड करून सांस्कृतिक कार्य विभागास ३१ मार्चला कळवली होती. त्यानुसार २५ जुलैला सांस्कृतिक खात्याने या सर्व कलाकारांच्या खात्यावर प्रत्येकी पाच हजार रुपये जमा केले आहेत.
----------------------------------
तालुका कलाकारांची संख्या
*आजरा ९
*भुदरगड ५
*चंदगड ४
*गगनबावडा ८
*गडहिंग्लज २
*हातकणंगले ३६
*कागल ९
*करवीर ३२
*पन्हाळा १०
*राधानगरी १४६
*शाहूवाडी ३
*शिरोळ १६
-------------------
एकूण २८०
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81091 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..