शिवाजी स्टेडियम मध्ये इश्कबाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी स्टेडियम मध्ये इश्कबाजी
शिवाजी स्टेडियम मध्ये इश्कबाजी

शिवाजी स्टेडियम मध्ये इश्कबाजी

sakal_logo
By

38787

शिवाजी स्टेडियममध्ये प्रेमींचा ठिय्या 
नशेबाजीचाही अड्डा; प्रशासनाने गांभीर्य ओळखून उपाययोजना करण्याची गरज

सुयोग घाटगे : सकाळ वृत्तसेवा 
कोल्हापूर, ता. २६ : प्रशासनाच्या ताब्यात असणारे छत्रपती शिवाजी स्टेडियम नेमके कशासाठी हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. एकेकाळी दिग्गज खेळाडूंनी गाजवलेले हे मैदान आता नेमके मैदान म्हणावे की प्रेंमीचा व नशेबाजीचा अड्डा हे समजत नाही. मैदानामध्ये प्रवेश केल्यानंतर आत दिसणारे चित्र हे प्रत्येक खेळाडूला व क्रीडा प्रेमींना विचलित करणारे आहे.   
जागतिक दर्जाची खेळपट्टी. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणारे एक भव्य मैदान. या मैदानावरच क्रिकेट, फुटबॉल, रब्बी व ऍथलेटिक्सचे धडे गिरवतच अनेकांनी राज्य, राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या. या मैदानाला क्रिकेटचा मोठा इतिहास आहे. असे असतानाही सध्या या मैदानाकडे बघणारे कोणीच नाही का ? असा प्रश्न निर्माण होत आहे. या मैदानामध्येच जिल्ह्याच्या क्रीडा विकासासाठी कार्यरत असणारे क्रीडा अधिकारी कार्यालय आहे. मात्र त्याचे प्रवेशद्वार रस्त्याच्या दिशेने असल्याने या कार्यालयाच्या खालच्या बाजूला मैदानाकडे नेमके चालते काय याकडे मात्र कोणीही लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. या कार्यालयातून खाली मैदानावर प्रवेश करण्यासाठी असणारा दरवाज्याच्या बाजूलाच काही मुलांचे टोळके दिवसभर बसून मावा चंगळण्यात व्यस्त असतात. तर  मैदानामध्येच एका बाजूला जलतरण तलाव आहे. या जलतरण तलावासाठी असणारे प्रेक्षक गॅलरीचा आडोसा मैदानाच्या बाजूला आहे. या आडोशाच्या खाली दिवसभर अवैध नशा करणारे काही तरुण आपला ठिय्या मारून असतात. यांना जर कोणी हटकले तर अर्वाच्च शिवीगाळ करणे, अतीच झाले तर अंगावर मारण्यासाठी धावणे असे प्रकार घडत आहेत. येथून पुढे काही अंतरावर असणाऱ्या महाविद्यालयाचे तरुण-तरुणी बसलेले असतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे असणारे हे मैदान मात्र काहीजणांमुळे बदनाम होत आहे. प्रशासनाने घटनांमागील गांभीर्य ओळखून ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.

कोट
परिसरातील काही ज्येष्ठ नागरिक मिळून नियमित  चालण्यासाठी येतो. ही कृत्ये आम्हालाच लज्जा उत्पन्न करणारी असतात. कोणाला काही सांगायला गेलास तुमच्या कामाचं बघाअशी उद्धट उत्तर मिळतात. यामुळे येथे असलेल्या कोणालाही सांगण्यात आम्ही धजावत नाही.
राजाराम निगवेकर, ज्येष्ठ नागरिक

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81117 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top