संजीवन समाधी सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संजीवन समाधी सोहळा
संजीवन समाधी सोहळा

संजीवन समाधी सोहळा

sakal_logo
By

38822 तीन कॉलम बातमी आणि फोटो तीन कॉलम

संजीवन समाधी सोहळा उत्साहात
कोल्हापूर ता. २६ :  संत शिरोमनी नामदेव महाराज परिवार आणि संत जनाबाई यांचा संजीवन समाधी सोहळा कोल्हापुरात पार पडला. नामदेव शिंपी समाजातर्फे येथील नामदेव बोर्डीगमध्ये सुचेता महाडिक आणि सदानंद महाडिक यांच्या हस्ते नामदेव महाराजांच्या प्रतिमा पूजन झाले. मंजिरी कपडेकर आणि हर्षराज कपडेकर यांच्या हस्ते दैवज्ञ बोर्डींग येथे महालक्ष्मी व नामदेव महाराज पादुका आणि प्रतिमापूजन झाले. या निमित्ताने आयोजित केलेल्या महाप्रसादाचा समाज बांधवानी लाभ घेतला. अजित हावळ, सीमा हावळ यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप झाले.
समाजातर्फे या संजीवन सोहळ्याच्या निमित्ताने ११ दिवस उत्सव आयोजित केला होता. यामध्ये नामदेव गाथेचे पारायन कीर्तन, भजन तसेच इतर कार्यक्रम होते. यानंतर सायंकाळी पालखी पादुकांची टाळ मृदंगाच्या साथीने मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे उदघाटन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या उपस्थितीत झाले.  भजन कीर्तन आणि विठ्ठल नामाचा गजर करत शहरातील विविध भागात फिरून मिरवणूक परत बोर्डिंगमध्ये आली. 
अध्यक्ष मनोज माळवदे, सरपंच प्रताप क्षीरसागर, सुशिल कोरडे, विकास कोरडे, किरण कोरडे, बाळासाहेब वर्णे, किरण उरणकर, हर्षराज कपडेकर, विनायक मुळे, सुचिता महाडीक, अलका बकरे, कोमल पिसे यांनी नियोजन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81168 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..