सी. एस. प्रवेश परीक्षेत यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सी. एस. प्रवेश परीक्षेत यश
सी. एस. प्रवेश परीक्षेत यश

सी. एस. प्रवेश परीक्षेत यश

sakal_logo
By

38867

साई स्कूलमध्ये कारगील दिन
इचलकरंजी : येथील श्री साई शिक्षण संस्थेच्या साई इंग्लिश स्कूल प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी कोल्हापूर जिल्हा सैनिक कार्यालयात माजी सैनिकांसोबत कारगील विजय दिवस साजरा केला. उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडकर, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अशोक पोवार, शिवाजी पोवार, उत्तम वेताळ, चंद्रशेखर पाने आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी खेडकर यांच्याकडे कारगील सैनिकांसाठी बनवलेले सदिश ग्रिटींग्ज दिले. विद्यार्थिनी मुग्धा बोलके व दिशा शर्मा यांनी भाषणातून कारगील विजयाचा गौरव केला. मुख्याध्यापक आर. एन. आळतेकर, मिलिंद कांबळे, प्राजक्ता बेहेरे, सुनीता भोईकर उपस्थित होते.


सी. एस. प्रवेश परीक्षेत यश
इचलकरंजी : जुलै २०२२ मध्ये घेतलेल्या सी. एस. (कंपनी सेक्रेटरी) प्रवेश परीक्षेत डीकेटीईच्या वाणिज्य शाखेच्या मार्गदर्शन वर्गाचे ७ पैकी ६ विद्यार्थी भरघोस गुणांसह उत्तीर्ण झाले. पहिल्याच बॅचच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवून डीकेटीईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. डीकेटीईच्या वाणिज्य ज्युनिअर कॉलेजमध्ये कंपनी सेक्रेटरी या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे अधिकृत स्टडी सेंटर आहे. परीक्षेत प्राची व्हसकल्ले, संदली जाधव, सोनिया चौगुले, रोहित कऱ्याप्पा, रूतिक शिंदे व आदित्य पटेल या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. त्यांना चिराग मानधने, अशोक केसरकर, प्रा. अग्निहोत्री, प्रा. सावंत, प्रा. मालासुद, प्रा. विजय चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे, व्हाईस चेअरमन आमदार प्रकाश आवाडे, सचिव डॉ. सपना आवाडे व संचालकांनी विद्यार्थी, शिक्षकांचे अभिनंदन केले.
---------

38866
अध्यक्षपदी बबन चौगुले
इचलकरंजी ः श्री लक्ष्मी ग्रामीण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बबन चौगुले तर उपाध्यक्षपदी चंद्रशेखर मोहिते यांची बिनविरोध निवड केली. दत्तवाड येथील श्री लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची २०२२ ते २०२७ पर्यंतची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सहायक सहकार अधिकारी प्रमोद फडणीस होते. बाबा महाराज मठाचे मठाधीश ऋषिकेशानंद महाराज, संचालक सक्काना सिद्धनाळे, प्रकाश पाटील, देवेंद्र चौगुले, महादेव पवार, शशिकांत सूर्यवंशी, रामचंद्र बिरणगे, कुमार कुंभार, साधना हेमगिरे, गंगाताई पाटील, आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक व्यवस्थापक सुभाष शिरगावे यांनी केले. आभार संचालक सूर्यकांत चौगुले यांनी मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81233 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top