
धान्य दुकानदार महासंघातर्फे नवी दिल्लीत आंदोलन
रेशन दुकान प्रतिनीधींचा
मंगळवारी संसदेला घेराओ
यादव, मोरे; नऊ मागण्यांबाबत देशव्यापी आंदोलन
कोल्हापूर, ता. २७ : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील रेशन धान्य परवानाधारकांच्या मागण्यांबाबत ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर्स फेडरेशनतर्फे नवी दिल्लीत मंगळवार (ता.२ ) रोजी मोर्चाने संसदेला घेराओ घालण्यात येणार आहे, जंतरमंतर येथे मागण्याबाबत केंद्र शासनाने दखल घेतल्याशिवाय आंदोलन संपणार नाही, अशी माहिती राज्य सचिव चंद्रकांत यादव, जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. भारतातील साडेपाच लाख रेशन परवानाधारकाचे प्रतिनिधी संसदेवर न्याय मागण्यासाठी संसद घेराओ करतील.
श्री. यादव म्हणाले, ‘‘नऊ मागण्यांबाबत देशव्यापी आंदोलन सुरू असून, देशभर ४ जुलै रोजी सर्व तहसील कचेरीवर आंदोलन केले. ११ जुलैला महाराष्ट्रातील सर्व जिल्हा कचेऱ्यावर आंदोलन केले. १८ जुलैला मुंबईत निवेदन दिले. या मागण्यांबाबत राज्य सरकार, केंद्र सरकार उदासीन आहे. म्हणून देशभरच्या परवानाधारकांतर्फे नवी दिल्लीत हे आंदोलन केले जाईल. केंद्रातील मोदीचे सरकार जीवनावश्यक वस्तुंवर जीएसटी लावत आहे.
राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजनेद्वारे सर्व परवानाधारकांना वर्ल्ड फूड कार्यक्रमांतर्गत ४४० रुपये प्रतिक्विंटल कमिशन द्यावे. फक्त गहू, तांदूळ अंत्योदय कार्डधारकांना साखर या खाद्यपदार्थावर एक किलो प्रति क्विंटल हॅण्डलिंग लॉस (तूट) देण्यावर सर्व राज्यांनी निर्णय घेण्याबाबत कार्यवाही करावी. सर्व राज्यातील स्वस्त धान्य दुकानांवर गहू, तांदूळव्यतिरिक्त खाद्यतेल, डाळी दरमहा द्याव्यात, यासह अन्य मागण्यांचा समावेश असेल.
यावेळी शहराध्यक्ष राजेश मंडलिक, खजिनदार अशोक सोलापुरे आदी उपस्थित होते.
......
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81279 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..