दुध उत्पादनाला आधुनिकतेची जोड द्या ः संचालिका रेडेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुध उत्पादनाला आधुनिकतेची जोड द्या ः संचालिका रेडेकर
दुध उत्पादनाला आधुनिकतेची जोड द्या ः संचालिका रेडेकर

दुध उत्पादनाला आधुनिकतेची जोड द्या ः संचालिका रेडेकर

sakal_logo
By

38942
मोदगे : दूध उत्पादकांच्या मेळाव्यात बोलताना श्रीमती अंजनाताई रेडेकर. शेजारी किरण पाटील, महेश कोले आदी.

दूध उत्पादनाला आधुनिकतेची जोड द्या
संचालिका रेडेकर; मोदगेमध्ये उत्पादक, शेतकऱ्यांचा मेळावा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २७ : ‘गोकुळ’च्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ उत्पादकांनी घ्यावा. या योजनांद्वारे दूध उत्पादनात वाढ करण्यासह त्याला आधुनिकतेची जोड देऊन अधिकाधिक दुधाचे उत्पादन घ्यावे आणि उत्पादित सर्व दूध गोकुळला पाठवावे, असे आवाहन संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांनी केले.
मोदगे (ता. हुक्केरी) येथील भावेश्‍वरी मंदिरात आयोजित दूध संस्था प्रतिनिधी, शेतकरी, उत्पादकांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी संस्थांच्या वतीने श्रीमती रेडेकर यांचा सत्कार करण्यात आला. श्रीमती रेडेकर म्हणाल्या, ‘गोकुळ दुधाला मुंबई बाजारपेठेत मोठी मागणी आहे. यामुळे अजूनही दूध उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी ‘गोकुळ’च्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा. गुजरात व हरियाणातून आणणाऱ्या म्हशींना २५ हजारांचे अनुदान आहे. वासरू संगोपनासाठीही चांगले अनुदान आहे. पशुखाद्य, पशुवैद्यकीय सेवा योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवावे. ग्रामीण अर्थकारण दूध व्यवसायावर अवलंबून आहे. कोरोनाकाळात याच व्यवसायाने शेतकऱ्यांना आधार दिला आहे. यामुळे त्याकडे पारंपरिक पद्धतीने न पाहता आधुनिकतेची जोड दिल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते.
मोदगे, दड्डी, सलामवाडी, कोट, बेळंकी, शेट्टीहाळी, मरणहोळ, नांगनूरचे संस्था प्रतिनिधी, शेतकऱ्यांनी विविध प्रश्‍न विचारून श्रीमती रेडेकर व दूध संकलन अधिकारी प्रकाश पाटील यांच्याकडून शंकांचे निरसन करून घेतले. पर्यवेक्षक महेश कोले यांनी स्वागत केले. सरपंच शरद पाटील यांनी आभार मानले. गजानन पाटील, किरण पाटील, विनायक पाटील, संजय पाटील, जयवंत दावणे, संभाजी गुरव, विश्‍वनाथ कोकीतकर, अरविंद गुरव, चंद्रकांत पाटील, जयराम पाटील, लक्ष्मण यमेटकर, लक्ष्मण पाटील यांच्यासह संस्था प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81291 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..